राजकारणात विविध पदे भूषवली, केंद्रीय मंत्रीही झालो, परंतु आमदार गणपत गायकवाड यांच्या सारखे 'आपला माणूस ' होता आले नाही !

■केंद्रीय मंत्री कपील पाटील यांनी कोंकण महोत्सवात जाहीरपणे व्यक्त केली खंत कल्याण पूर्वेतील कोकण महोत्सवाची सांगता


कल्याण : सार्वजनिक जिवनातून राजकारणात आल्यानंतर ग्रामपंचायत पासुन थेट केंद्रीय मंत्री पदापर्यंत मजल मारता आलीपरंतु आमदार गणपत गायकवाड यांच्या सारखे मला 'आपला माणूस होता आले नाही अशी खंत केंद्रीय मंत्री कपील पाटील यांनी कल्याण पूर्वेत गेली दहा दिवस सुरु असलेल्या कोंकण महोत्सवाच्या सांगता समारोहात उपस्थितांना संबोधीत करतांना व्यक्त केली. कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या विद्यमाने कल्याण पूर्वेत २५  फेब्रुवारी ते ६ मार्च या सलग १० दिवसांच्या दरम्यान कोंकण महोत्सव २०२२ चे भव्य दिव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाची सांगता केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीने करण्यात आली .


या समयी उपस्थितांना संबोधीत करतांना महोत्सवाच्या आयोजकांचे कौतुक करतांना मंत्री कपिल पाटील यांनी सांगितले कीकोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष संजय मोरे हे कोठेही असले तरीही महाभारतातील संजया प्रमाणे ते आजुबाजुची इंतभूत माहिती ही आमदार गणपत गायकवाड यांना देत असावेत. आमदार गणपत गायकवाड हे वर्षाचे बाराही महिने २४ ७ या पद्धतीने नागरीकांच्या सेवेत असतात.


 मी ग्रामपंचायती पासुन थेट केंद्रीय मंत्रीमंडळात जावून केंद्रीय मंत्री झालो आहे परंतु मला आमदार गणपत गायकवाड यांचे सारखे 'आपला माणूसहोता आले नाही. कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या कामाचे कौतुक करतांनाच त्यांनी प्रतिष्ठाणच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सल्ला दिला कीप्रतिष्ठाणचे कार्य हे कोकणच्या कल्याणासाठी सातत्याने कार्यरत राहून कोकणच्या खाद्य संस्कृती बरोबरच कलाकृषीपर्यटन या क्षेत्रासाठीही भरीव असे काम करावे.


मनसे आमदार राजु पाटील यांनीही या कोंकण उत्सवाला आवर्जुन उपस्थिती दर्शवून आयोजकांच्या आयोजन कौशल्ल्याचे कौतुक केले.सलग दहा दिवस चाललेल्या या कोंकण महोत्सवाच्या सांगता समारोहात स्वयंभू प्रोडक्शन मुंबईचे के. उन्मेश प्रस्तुत 'सैनिक हो तुमच्या साठी हा देशभक्ती पद गित गायन नृत्य आविष्काराच्या कार्यक्रमाने संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले होते.

Post a Comment

0 Comments