एसएमईंच्या मदती साठी पेटीएम पेमेंट गेटवेची सुविधा

■ 'पेमेंट अॅनालिटिक्स' लाँच; व्यवसाय वृद्धीसाठी डेटा-केंद्रित निर्णय घेण्यास मदत करणार ~


मुंबई, २२ मार्च २०२२ : पेटीएम पेमेंट गेटवेने अद्वितीय सेवा 'पेमेंट अॅनालिटिक्स' लाँच केली आहे. हे ऑनलाइन व ऑफलाइन व्यापाऱ्यांसाठी डेटा विश्लेषण वैशिष्ट्य आहे. ज्यामुळे त्यांना त्यांचे ग्राहक व त्यांच्या पेमेंट पसंती समजण्यास मदत होईल. ही सेवा विना अतिरिक्‍त खर्चामध्ये सर्व पेटीएम व्यापाऱ्यांसाठी उपलब्ध आहे. पेटीएमची पूर्णत: मालकीची उपकंपनी पेटीएम पेमेंट्स सर्विसेस लिमिटेडने पेटीएम पेमेंट गेटवे सादर केले आहे.


      पेमेंट अॅनालिटिक्स विशेषत: पेमेंट सोर्स, पेमेंट प्रवाह, ग्राहकांची व्यवहार करण्याची पद्धत, युजर रिटेन्‍शन, पेमेंट यशस्वी दर आणि पेमेंट अयशस्वी होण्यामागील कारणांबाबत रेडी-मेड रिपोर्ट्स देण्याकरिता डिझाइन करण्यात आले आहे. यामुळे व्यवसाय मालकांना त्यांची वेबसाइट आणि/किंवाअॅपवरील ग्राहकांची व्यवहार करण्याची पद्धत व पसंतींचे प्रभावीपणे विश्लेषण करता येईल. तसेच यामुळे व्यवसाय मालकांना सखोल माहिती मिळण्यास मदत होईल. परिणामत: त्यांना तंत्रज्ञानामध्ये सुधारणा करण्यास आणि लक्ष्य विपणन धोरण परिभाषित करण्यास मदत होईल.


       हे वैशिष्ट्य तीन सेवा देते - पेमेंट सोर्स अॅनालिटिक्स, जेथे व्यवसायांना विभिन्न पेमेंट साधनांच्या कामगिरीबाबत सखोल माहिती मिळण्यासोबत पेमेंट अयशस्वी होण्याचे प्रमाण कशाप्रकारे कमी होईल यासंदर्भात सूचना मिळू शकतात; कस्‍टमर अॅनालिटिक्स, ज्या माध्यमातून व्यवसाय त्यांच्या ग्राहकांना उत्तमप्रकारे समजून घेण्यासोबत त्यांच्या पेमेंट करण्याच्या पद्धतीबाबत माहिती प्राप्त करू शकतात आणि पेमेंट फ्लो अॅनालिटिक्स, जेथे व्यवसायांना यशस्वीतेचे प्रमाण व क्रॉस प्लॅटफॉर्मसोबत क्रॉस डिवाईस कामगिरीची माहिती मिळू शकते.


      या सेवांसह पेटीएमचे ऑफलाइन व्यापारी सहयोगी त्यांच्या जीएमव्हीबाबत खात्री बाळगू शकतात आणि दैनंदिन किंवा मासिक आधारावर एकूण व्यवहारांची संख्या माहित करून घेऊ शकतात. रिटेल साखळी व्यवसाय पेमेंट अॅनालिटिक्सचा वापर करत प्रत्‍येक स्‍टोअरचा जीएमव्ही डेटा मिळण्याची निवड करू शकतात.


      पेटीएम पेमेंट्स सर्विसेस लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण शर्मा म्हणाले, "पेमेंट अॅनालिटिक्सचे लाँच आणखी एक इंडस्‍ट्री-फर्स्ट पाऊल आहे, जे व्यापारी सहयोगी व उद्योजकांना त्यांचा व्यवसाय सुलभ करण्यामध्ये आणि त्यांच्या लक्ष्य ग्राहकांना समजून सर्वोत्तम सेवा देण्यामध्ये मदत करणाऱ्या आमच्या दृष्टीकोनाचा भाग आहे. यामुळे व्यवसाय मालकांना जलदपणे विकसित होण्यासाठी सुधारित विपणन धोरणे रचण्यामध्ये मदत होईल."


     पेटीएम पेमेंट गेटवे भारतातील सर्व आकाराच्या व्यवसायांमधील सर्वात पसंतीचे पेमेंट सोल्यूशन आहे. व्यासपीठाचे ९९.९९ टक्के अपटाइम व उद्योगातील सर्वोत्तम यशस्वी दर भारतातील स्टार्टअप्स व अव्वल कॉर्पोरेट्समध्ये लोकप्रिय असण्यामागील प्रमुख कारणे आहेत. 


      यामुळे व्यापाऱ्यांना पेटीएम वॉलेट आणि इतर पर्याय जसे पेटीएम पोस्टपेड व ईएमआयच्या माध्यमातून १-क्लिक चेकआऊटसह विनासायास पेमेंट्स अनुभव देता येतो. व्यापाऱ्यांना त्यांच्या वेबसाइट्स व अॅप्लीकेशन्समध्ये पेटीएम पेमेंट गेटवेची भर करण्यासाठी आकर्षून घेणारे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे नेक्स्ट-डे सेटलमेंट्स.

Post a Comment

0 Comments