दावडी येथे २५० कोटीचा भ्रष्टाचार उघड माजी नगरसेवकाचा गरीब शेतकऱ्याची जमीन लाटण्याचा प्रयत्न असफल न्यायालाचाय दणका


कल्याण : दावडी येथे २५० कोटीचा भ्रष्टाचार उघड झाला असून न्यायालयाच्या दणक्यामुळे माजी नगरसेवकाचा गरीब शेतकऱ्याची जमीन लाटण्याचा प्रयत्न असफल झाला आहे. 
दावडी येथील शेतकरी मारुती पांडू पाटील यांची २० एकर जमीन आहे. या जामिनावर मा. नगरसेवक जालिंदर पाटील यांची नजर होती.  


           त्यांनी हि जमीन
हडपण्यासाठी बोगस वारस,  फेरफार, आणि तयार केला होता. या केस संदर्भात शेतकरी मारुती यांनी १९९४ ते २०१० पर्यंत लढ दिला, त्यानंतर मारुती पाटील हे मयत झाले नंतर त्यांचे हक्कदार बाळकृष्ण हरी भाऊ पाटील यांनी १२ वर्ष हा लढा सुरु ठेवला.


          हा लढा लढत असतांना जालिंदर पाटील यांनी बोगस वारस, फेरफार तयार केला व तो फेरफार मा उपविभागीय अधिकारी ठाणे यांनी दि. २७.०९.२०१० रोजी रद्द केला. तूर्त शासन जमाकारून हक्कदार यांना मृत्यू पत्रा बाबत सत्यता पडताळणी व वारस दाखला तसिलदार कल्याण यांच्या कडे सादर करून निर्णय घेण्य बाबत आदेशित केले.


        त्यानंतर हक्कदार यांना  न्यायालयाकडून मृत्यू पत्राची सत्यता पडताळून प्रोबेट दाखला देण्यात आला. त्यानंतर सीताराम मारुती पाटील व इतर यांनी समान नावाच्या व्यक्ती फायदा घेऊन दि. २८.०२.२०११ रोजी मा न्यायलयाची दिशा भूल करून बोगस वारस दाखला मिळवला त्यानंतर सदरचा बोगस वारस दाखला न्यायालयाने दि. ६.६.२०१७ रोजी रद्द केला. 


        तसेच जालिंदर जयराम पाटील यांनी वासुदेव अनंता भोईर यांना हाताशी धरून २०१० ते २०२१ पर्यंत मुंबई उच्च न्यायलया, दिवाणी न्यायालय, मसूल न्यायलयात महाराष्ट्र शासन व हक्कदार बाळकृष्ण पाटील यांच्या विरोधात खोटे दावे दाखल केले होते. हे सर्व खोटे दावे मा. न्यायलयाने सत्यता पडताळून रद्द केले.


         अप्पर जिल्हा अधिकारी ठाणे यांच्या न्यायालयाने हक्कदार बाळकृष्ण हरी भाऊ पाटील यांच्या बाजूने दि. ११. १२. २०१८ रोजी निर्णय देऊन तूर्त  शासनाची नोंद कमी करून हक्कदार यांच्या प्रोबेट आदेश अनुसार मा तासिलदार कल्याण यांच्या न्यायलयाने दि. २५.०६.२०२१ रोजीच्या अदेश्नुसार हक्कदार बाळकृष्ण हरीभाऊ पाटील यांच्या नावाची ७/१२ सदरी दि. ०४.०३.२०२२ फरेफार मध्ये नोंद करण्यात आली असल्याची माहिती वकील दिपक उनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

Post a Comment

0 Comments