भाईंदर पश्चिमे कडील महेश्वरी भवन रोड येथील रस्त्याची खासदारां कडून पाहणी


ठाणे,  प्रतिनिधी - मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील भाईंदर पश्चिम प्रभाग क्रमांक १ महेश्वरी भवन रोड येथील डी मार्ट समोरील रस्त्याची पहाणी खासदार राजन विचारे यांनी आज मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांच्यासोबत केली. त्यावेळी आमदार गीता जैन, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, उपमहापौर प्रवीण पाटील, ओमप्रकाश गरोडिया, प्रकाश जैन, आयुक्त मारुती गायकवाड, वाहतूक शाखेचे व पोलिस विभागाचे अधिकारी तसेच या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


            आज मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात महेश्वरी भवन रोड येथील रस्त्याच्या मार्गावर अनेक सोयी सुविधांचा अभाव असल्यामुळे ही माहिती खासदार राजन विचारे यांना मिळताच त्यांनी सदर रस्त्याची पाहणी आज आयुक्त दिलीप ढोले यांच्यासोबत करून गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला डीपी रस्त्याचे काम मार्गी लावावे तसेच तत्पूर्वी या मार्गावर पाणी लाईन ड्रेनेज लाईन जोडण्यासाठी राजन विचारे यांनी महानगर पालिकेच्या संबंधित विभागाला सूचना दिल्या आहेत. तसेच या मार्गावर डी मार्ट येथे रिक्षा स्टँड मुळे होणारी वाहतूक कोंडीवर समस्या वर उपाय योजना करा असे देखील सांगितले. 


              त्याच बरोबर डी मार्ट मधील इमारतीच्या भूमिगत पार्किंगच्या ठिकाणी धान्याचे गोदाम केल्याने डी मार्ट मध्ये येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या वाहनांची पार्किंग रस्त्यावर करावी लागते. यावर मार्ग काढून लवकरात लवकर वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याची विनंती खासदार राजन विचारे यांनी आयुक्तांकडे केली. खासदार राजन विचारे यांनी आयुक्त दिलीप ढोले यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments