भिवंडीत बी. एम. डब्ल्यु कारचा नंबर रिक्षावर लावून फिरणाऱ्या चालकास कोनगाव पोलीस ठाण्याचे पोलीसांनी ठोकल्या बेड्या.


भिवंडी : दि.29 (प्रतिनिधी ) कोनगाव पोलीस ठाणे हद्दीत एक रिक्षाचालक आपल्या रिक्षावर चक्क बी एम डब्ल्यू या महागड्या आलिशान कार चा नंबर लावून फिरत असताना कोनगाव पोलिसांनी पाठलाग करून त्यास बेड्या ठोकल्या आहेत.जितेंद सेवालाल पटेल, वय 32, रा. फेणागाव,भिवंडी असे अटक केलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे .


   
कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे यांना नाशिक मुंबई हायवे रोड, सिप्ला वेअर हाऊसचे परिसरात पिंपळास गाव या परिसरात इसम नामे जितेंद्र पटेल हा त्याचे ताब्यातील रिक्षा क्रमांक MH04-GN 7100 हिचे वर बनावट नंबर प्लेट लावुन फिरत आहे.


 अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने  पोलीस उप निरीक्षक पराग भाट, पोलीस उप निरीक्षक जे आर शेरखाने व पथकातील पोलीस कर्मचारी यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असता पोलीस पथक वरील ठिकाणी गेले असता त्यांना एक इसम त्याचे ताब्यातील रिक्षा क्रमांक MH04-GN 7100 हिचे वर बसुन संशयीतरित्या फिरत असताना दिसुन आला.


तेव्हा त्यांनी सदर रिक्षा चालकास थांबण्याचा इशारा केला असता, तो न थांबताच भरधाव वेगाने जावु लागला, त्यावेळी वरिल पोलीस अधिकारी यांनी सदर इसमाचा पाठलाग करुन त्यास शिताफीने ताब्यात घेवून त्याचेकडे सदरच्या रिक्षा बाबत विचारपुस केली असता, त्याने काहीएक समाधान कारक माहिती दिली नाही. 


तसेच रिक्षाची कागदपत्रे सुध्दा दाखविलेली नाहीत. त्यामुळे पोलीसांनी मोबाईल अँप द्वारे रिक्षावर असलेल्या क्रमांकाचे मालकाचा नाव पत्ता तपासला असता, तो सोनु हरिओम शर्मा भाईदरपाडा, ठाणे यांच्या नावे ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात बी.एम.डब्लु कार चा असल्याचे निष्पन्न झाले. कोनगाव पोलिसांनी रिक्षा चालक जितेंद्र सेवालाल पटेल व त्याचा साथीदार विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतले .व त्यानंतर कार मालक सोनु हरिओम शर्मा यांना कोनगाव पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची व शासनाची आरोपी रिक्षा चालक जितेंद्र सेवालाल पटेल व त्याचा साथीदार एक विधी संघर्षग्रस्त बालक याने फसवणुक केली गुन्हा दाखल करीत 75 हजार रुपयांची रिक्षा जप्त केली आहे .


आरोपीस भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने 30 मार्च पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे .विशेष म्हणजे या रिक्षाचा चेसिस व इंजिन नंबर याचा बोध होत नसल्याने कोनगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments