बल्याणी रस्त्यासाठी निधी देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


कल्याण : अतिदुरावस्था झालेल्या बल्याणी रस्त्याच्या कामासाठी मुख्यमंत्री निधीतून अतितातडीने ९ कोटी रुपयांचा निधी देण्यात येऊन संभाव्य जीवितहानी टाळावीअशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना येथील एका पत्रकाराने इमेलद्वारे केली आहे. दरम्यानसदरचा इमेल मुख्यमंत्री कार्यालयाकडून नगरविकास कार्यालयाकडे वर्ग करण्यात आल्याचे इमेलकर्त्याला कळविण्यात आले आहे.


गेल्या दहा महिन्यांपासून बल्याणी रस्त्याच्या दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याने कल्याण येथील पत्रकार प्रविण आंब्रे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इमेल पाठवून त्यांचे या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील टिटवाळा ते बल्याणी ते आंबिवली रेल्वे स्टेशन ते  मोहोने गेट येथपर्यंतच्या रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर लागणाऱ्या बल्याणी प्रभागात हा रस्ता गेल्या पावसाळ्यात काही ठिकाणी पूर्णतः उखडला गेला आहे. 


अशा खड्डेमय रस्त्यातून प्रवास करणे वाहनचालकांना विशेषतः दुचाकी चालकांना जीवघेणे झाले आहे. अशा दुरावस्था झालेल्या या रस्त्यावर वाहनांना वारंवार अपघात- विशेषत: दुचाकींना घडत आहेत. सुदैवाने जीवितहानी झालेली नसली तरी लहानमोठ्या दुखापतीच्या शेकडो घटना या रस्त्यावर घडल्या आहेत. मात्र या रस्त्यावर अपघात घडून जीवित-वित्तहानी झाल्यास त्याला कोण जबाबदार असेलअसा सवाल मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या इमेलमध्ये करण्यात आला आहे.


गेल्यावर्षी (२०२१) पावसाळापुर्वीच या रस्त्यावर- बल्याणी प्रभागात काही ठिकाणी खड्डे पडले होते. मात्र पावसाळा पूर्व कामे करताना हे खड्डे बुजवण्याकडे महापालिका प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने पावसाळ्यात हे खड्डे वाढत जाऊन अनेक ठिकाणी संपूर्ण रस्ताच उखडला गेला. दोन-चार वेळा या रस्त्याची अधेमध्ये थातुरमातुर खडी भरण्याची कर्तव्यपूर्ती केली गेली. महापालिका प्रशासन या रस्त्यावर केवळ खडीचा मारा करून  आपली कर्तव्यपूर्ती केल्याचे समाधान मानत असल्याचे या इमेलमध्ये म्हटले आहे.


दहा महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटूनही टिटवाळा ते बल्याणी ते आंबिवली रेल्वे स्टेशन ते मोहोने गेट येथपर्यंतच्या रस्ता महापालिका प्रशासक प्रशासकीय राजवट असूनही नव्याने बांधू शकलेले नाहीत. या रस्त्यावर आवश्यक तेथे डागडुजी करण्याची गरज आहे. तसेच बल्याणी येथे हा रस्ता पूर्णतः नव्याने करण्याची गरज आहे. केवळ बल्याणीमधून जाणारा हा रस्ता नव्याने बांधण्यासाठी ८-९ कोटी रुपयांचा निधी लागणार असल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगत आहेत. 


मात्र महापालिकेकडे निधी नसल्याने हे काम केले जात नाही. याकडे लक्ष वेधत या बल्याणी येथील रस्ता बनविण्याची निकड लक्षात घेऊन मुख्यमंत्री निधीतून सुमारे ९ कोटी रुपयांचा निधी तातडीने देण्यात यावाअशी मागणी पत्रकार आंब्रे यांनी केली आहे. दरम्यानसदरचा इमेल मुख्यमंत्री कार्यालयाकडून नगरविकास कार्यालयाकडे वर्ग करण्यात आल्याचे त्यांना कळविण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments