भिवंडीतील झिडके ग्रुप सेवा सोसायटीच्या संचालक मंडळ चुरशीच्या निवडणूकीत जय किसान शेतकरी पॅनला घवघवीत यश!


भिवंडी दि 6 (प्रतिनिधी )  तालुक्यातील झिडके ग्रुप विविध सेवा सहकारी सोसायटीची संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुक नुकतीच पार पडली आहे.या निवडणुकीत जय किसान शेतकरी परिवर्तन पॅनल व शेतकरी सेवा सहकारी पॅनलचे उमेदवार आमने-सामने उभे होते.ही निवडणूक एकूण चौदा संचालक निवडीची होती,त्यामुळे दोन्ही पॅनलचे एकूण 28 उमेदवार आपले भवितव्य अजमावित होते.


            परंतु प्रत्यक्षात मतदारांनी जय किसान शेतकरी परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांची निवड करून,या पॅनलच्या चौदाच्या-चौदा उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिल्यामुळे या पॅनलला घवघवीत यशामुळे एकहाती सत्ता स्थापन करण्याची संधी मतदार-सभासदांनी प्राप्त करून दिल्यामुळे विजयी उमेदवार आनंद व्यक्त करीत असतानाच,मतदारांचे कृतज्ञतापूर्वक आभारही व्यक्त करीत आहेत.

            परंतु जय किसान शेतकरी परिवर्तन पॅनलचा प्रतिस्पर्ध्यी शेतकरी सेवा पॅनल यांना आपला एकही उमेदवार निवडून न आल्यामुळे अत्यंत दुःख सहन करण्याची वेळ आली आहे.याचे मुख्य कारण स्पष्ट  एकहाती सत्ता असणार आहे.

           निवडून आलेले जय किसान परिवर्तन पॅनलचे उमेदवार याप्रमाणे-संजय दामोदर पाटील,शरद दुंदू पाटील,विलास श्रीरंग पाटील,मोहन बाबूराव ठाकरे,जयशंकर सुभाष भोईर,शांताराम शिवा भोईर,संतोष पांडुरंग लाटे,भाऊ महादू पाटील,जगदीश केशव पाटील,मंगेश रामू पाटील, किशोर कृष्णा जाधव,प्रदीप हरिभाऊ जाधव,अनिता अनंता पाटील,कविता कैलास जाधव असे असून,मतदार-सभासदां कडून नवनिर्वाचित संचालकांनी संस्थेच्या  शेतकरी सभासदांच्या हितासाठी काम करीत असताना,निष्पक्षपातीपणे काम करून,भविष्यात संस्थेसाठी भरीव स्वरूपाचे काम करावे,अशी या प्रसंगी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments