आदिवासी बांधव घेणार मंत्री प्राजक्त तनपुरे व हसन मुश्रीफ यांची भेट तनिष्क स्टोन क्रशरच्या स्फोटका मुळे तडा


डोंबिवली ( शंकर जाधव ) अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली गाव या हाजीमलंग परिसरातील   आदिवासी समाजाच्या जवळपास ९५ घरांना तनिष्क स्टोन क्रशरच्या दगड फोडीच्या स्फोटकामुळे तडा गेला आहेत. प्रमाणापेक्षा जास्त क्षमतेचे स्फोटक तनिष्क स्टोन क्रेशर वापरत असल्यामुळे कुशिवली परिसरातील शासकीय योजनेतील व खाजगी मालकी असलेल्या आदिवासीच्या घरांना तडे गेल्याचा गावकऱ्यांचा असा आरोप आहे. 


        शनिवारी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत आदिवासी गावातील घरांची पाहणी केली. आदिवासी बांधवाना घेऊन आदिवासी विकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ भेट यांची भेट घेऊन निवदेन देणार असल्याचे यावेळी तपासे यांनी यावेळी सांगितले.   

   

      या भागातील अवैद्यरित्या सुरु असलेले स्टोन क्रेशर बंद व्हावे असा ठराव ग्रामपंचायतीने यापूर्वीच केला आहे. आदिवासी घरांना झालेले नुकसान तनिष्क स्टोन क्रेशरने भरून द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन आदिवासी ग्रामस्थ करतील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. येथील गावात राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी पाहणी केली.


         पाहणी दौऱ्यात महिला अध्यक्ष सारिका गायकवाड, विभागप्रमुख प्रल्हाद पाटील, अंबरनाथ शहराध्यक्ष सदामामा पाटील, अंबरनाथ तालुकाध्यक्ष काशिनाथ पाटिल, अंकुश पाटील, रवी पाटील, विजय पाटिल, उपसरपंच धर्मा भाग्यवंत, उमेश वायले, नरेश वायले, चंद्रकांत पाटील, इम्रान खान, कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष अर्जुन नायर, मीनाक्षी अहिरे, विकास सिंग,डॉ.अमोल मोलवडे यासह अनेक सरपंच व ग्राम सदस्य उपस्थित होते. 


        राज्यशासनाच्या आदिवासी विभाग, गृह विभाग व ग्राम विकास विभाने संबंधितांवर तातडीने कार्यवाही करावी अशी विनंती राज्यशासनाला करणार असल्याचे आश्वासन तपासे यांनी गावकऱ्यांना दिले.याबाबत तपासे म्हणाले, लवकरच येथील आदिवासी बांधवाना घेऊन आदिवासी विकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ भेट यांची भेट घेऊन निवदेन देणार आहे. 


           अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली गाव हाजीमलंग परिसरातील आदिवासी समाजाला शासकीय योजनेतील घरांना दिली आहेत.मात्र जर या घरांना तनिष्क स्टोन क्रशरच्या दगड फोडीच्या स्फोटकामुळे तडे पडत असतील तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. प्रकल्प अधिकाऱ्यांना आदिवासी गावाचा दौरा करण्यास सांगणार असल्याचेही तपासे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments