कुणबी समाज प्रतिष्ठानच्या वधुवर परिचय मेळाव्यात ६०० वधुवरांचा सहभाग


कल्याण : कुणबी समाज प्रतिष्ठान कल्याणच्या वतीने पश्चिमेतील सिद्धिविनायक हॉलभोईरवाडी येथे आयोजित वधु-वर परिचय मेळाव्यात ६०० वधूवरांनी सहभाग घेतला. वधुवर मंडळ अध्यक्ष सुनील सांबरे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात गायक रामचंद्र भोईर यांच्या ईशस्तवन व स्वागत गीताने झाली व प्रास्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवराम वाळिंबे यांनी केले.


या कार्यक्रमाला रामचंद्र भोईर यांच्या लग्न गीताने रंगत आणली तर नंदन पाटील व शर्मिला पष्टे यांनी आपल्या शैलीत खुमासदार उत्तम निवेदक व निवेदिका म्हणून काम पाहून कार्यक्रम रंगतदार केला. त्यांना सह निवेदक व निवेदिका म्हणून किशोर पाटील व ज्योती पाटील यांनी उत्तम साथ दिली. या कार्यक्रमात साधारण ५५०  ते ६०० वधुवर,  पालक व समाज बंधू भगिनी यांनी  हजेरी लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. १०५ वधु-वरांनी  प्रत्यक्ष मंचावर येऊन आपला परिचय दिला. वधुवर मंडळ  अध्यक्ष सुनील सांबरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपस्थित वधूवरांना मार्गदर्शन केले. प्रतिष्ठांनचे सचिव संतोष पाटील यांनी आभार व्यक्त करून राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.


या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले वधुवरपालकसमाज बंधू भगिनीदेणगीदारइतर कुणबी समाज मंडळांचे पदाधिकारीसदस्य तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रतिष्ठांनचे जेष्ठ सदस्य एम एस पाटील, हिराजी धानकेजगन्नाथ मराडे,  उपाध्यक्ष प्रदीप विषेउपाध्यक्षा मिलन तारमळेखजिनदार उल्हास पाटील,  सहसचिव  दयानंद पाटीलसदस्य केशव वेखंडेजितेंद्र पाटीलसुनील पाटीलसल्लागार संजय जाधवमनोज आंबेकरडॉ. जगदीश पाटीलअशोक भोईरप्राची पाटीलवधुवर सूचक मंडळाचे उपाध्यक्ष रमेश भेरेउपाध्यक्षा जोत्स्ना जाधवसदस्य हरिश्चंद्र बोराडेशैलेश सातवीप्रतिष्ठांनचे आजीव सदस्य दयाराम पाटील, बी आर पाटीलसंजीव पाटीलजगन्नाथ पाटीलसंदीप मांझेकेतन निपुर्तेनितीन पाटीलसाक्षी पाटीलसुनीता मांझेसंगीता पाटीलरंजना पाटीलशुभांगी वाळिंबेप्रीती सांबरेकविता वेखंडे यांनी विशेष मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments