कोळी समाजा कडून सेन्चुरी रेयॉन मधील परिवर्तन पँनलच्या विजयी उमेदवारांचा सत्कार


कल्याण : कोळी समाजाकडुन सेन्चुरी रेयॉन कंपनीतील परिवर्तन पँनलचा विजयी उमेदवारांचा सत्कार करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यायावेळी कोळी महासंघाचे उपनेते देवानंद भोईरउपाध्यक्ष दीपेश ढोणेकोळी महासंघाचे कल्याण तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर भोईरसचिन कोळी, बाबू ढोणेजोगेंद्र भंडारीयोगेंद्र भंडारीगणेश वास्कर कैलास ढोणेतसेच परिवर्तन पँनलचे विजयी उमेदवार व अध्यक्ष रवींद्र कोनकरउपाध्यक्ष प्रमोद काळे, कृष्णा पाटील, ज्वाईंट सेक्रेटरी नरेश कोनकर, रमेश कोनकरजे.पी. पांडेगणेश मडवी, वीरेंद्र यादव, कमळाकर बडेभीमसिंह शेखावत आदीची समावेश आहे.


यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र कोनकर यांनी सांगितले की कामगारांनी आमच्या बाजूने मतदान करून परिवर्तन पँनेल विजयी केले आहे. कामगारांच्या बोनसअग्रीमेंटपगारवाढ आदी प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहीनकामगारांना न्याय मिळवून देणार. गेल्या पंचवीस वर्षांपासून दुसरी युनियन होतीनिवडणूक होत नव्हत्या अखेर आम्ही न्यायालयात गेले लढा दिला शेवटी न्याय देवतेने निवडणूक घेण्यासाठी आदेश दिले व निवडणूक झाली. या निवडणुकीत आमचे परिवर्तन पँनेल विजयी झाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


तर कोळी महासंघाचे उपनेते देवानंद भोईर यांनी सांगितले की कामगारांनी विश्वास ठेवून परिवर्तन पँनलला निवडून दिले आहेत्यांच्या विश्वासाला तडा जाऊन देऊ नका. गेल्या अनेक वषैपासून रखडलेले प्रश्न सोडवा. कामगारांना न्याय दया.  पंचवीस वर्षापूर्वी कामगार नेते वाल्मिक कोनकर यांनी सेन्चुरी रेयॉन कंपनीत युनियन सुरू केली होती. पुन्हा त्यांच्या मुलांनी कामगार नेते रवींद्र कोनकर यांनी आपल्या वडिलांचे स्वप्नं पूर्ण केले व परिवर्तन पँनेल विजयी झाले. त्यांना  पुढील वाटचालीस शुभेच्छा देत असल्याचे भोईर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments