मतदारांनी शिवसेनेची लायकी दाखवून दिली भाजपा आमदार गणपत गायकवाड यांची शिवसेनेवर टीका

    


कल्याण : भाजपला पराभूत करण्यासाठी शिवसेनेने उत्तर प्रदेश आणि गोवा येथे उमेदवार उभे केले. मात्र  त्यांना नोटा पेक्षाही कमी मतदान झाले. यामुळे मतदारांनी शिवसेनेला लायकी दाखवून दिली अशी टीका भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेवर केली आहे.


महाराष्ट्राच्या चार राज्यात भाजपला सत्ता मिळाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गिरे तो भी टांग उपर.. कारण जे गोवामध्ये त्यांना नोटा एवढे सुद्धा मतदान झाले नाही. भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी त्यांनी उमेदवार उभे केले मात्रत्या उमेदवारांना नोटा पेक्षा कमी मत मिळाली. त्यांची लायकी मतदारांनी दाखवून दिली आहे. अशी घणाघाती टीका भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेवर केली आहे. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या उपस्थित कार्यकर्त्यांनी आज जल्लोष केला त्यावेळी त्यांनी हे विधान केले.


हा उत्सव विजयाचा, असून भाजपावरील जनतेच्या विश्वासाचा आहे. भारतीय जनता पार्टीचे उत्तरप्रदेशगोवामणिपूर आणि उत्तराखंड येथे पुन्हा एकदा मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा निवडून दिलेल्या बद्दल कल्याणपूर्वेतील तिसाईहाऊस या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून विजयाचा आनंद आणि जल्लोष लाडू वाटून तसेच ढोल-ताशांच्या निनादात मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा करण्यात आला असल्याची माहिती आमदार गणपत गायकवाड यांनी दिली. 


यावेळी भाजपा कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, मनोज राय, भाजप पदाधिकारी संदीप तांबे, नितेश म्हात्रे आदींसह इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments