तहानलेल्या पक्षांसाठी पक्षीप्रेमींची धडपड... पॉजची सिमेंटची भांडी तर एसटी महामंडळातील कर्मचाऱ्याचे प्रबोधन


डोंबिवली ( शंकर जाधव ) शहरात सिमेंटचे जंगल झालंं पण या जंगलात पक्षी शहराबाहेर जाऊ लागले.त्यात कडक उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात प्राणी -पक्षांचा जीव कासावीस होत असतो.अश्यावेळी प्राणी -पक्षी प्रेमींनी शहरातील विविध अनेक ठिकाणी तहानलेल्या पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली.पॉजची सिमेंटची भांडी तर एसटी महामंडळातील कर्मचारीचे प्रबोधन हे यातील प्रमुख उल्लेखनीय काम म्हणता येईल.

 

        एप्रिल ते मे असे दोन महिन्याच्या कडक उन्हात प्राणी- पक्षी जिथे पाणी दिसेल तिकडे जात असतात.पक्षांची हि कासावीस पासून १९९५ साली भारतात अॅनिमल वेल्फेअर बोर्डाने शहरातील विविध ठिकाणी पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याचे हौद बनवले. त्यानंतर २०१० सालापासून पॉज संस्थेने प्रथम मुंबईत पक्षांसाठी सिमेंटची भांडी ठेवण्यास सुरुवात केली.या भांड्यात पाणी पाहून हळूहळू पक्षी पाणी पिण्यासाठी येऊ लागले. पॉज संस्था दरवर्षी ५० प्राणी व पक्षी प्रेमीना सिमेंटची भांडी मोफत देत असल्याची माहिती संस्थेचे निलेश भणगे यांनी दिली.

 

        कोल्हापुरात एसटी महामंडळात मॅकेनिकल डिपार्टमेंट मध्ये काम करणारे  अवधूत पाटील यांचे प्राणी-पक्षांवर अफाट प्रेम आहे.कडक उन्हाळ्यात प्राणी-पक्षी यांनी `सेल्फी विथ बर्ड पाणपोई` असा उपक्रम दरवर्षी राबवितात.हा उपक्रम महाराष्ट्राभर सुरु आहे. पक्षांसाठी पाण्याने भरलेले पात्र ठेवून पाण्याविना तडफडणाऱ्या पक्षांना जीवदान मिळेल, आपण पाणपोई ( जलपात्र ) सोबत एक सेल्फी घेऊन ती ७३५०२६५६१७ यावर पाठवा असे आवाहन पर्यावरणमित्र पाटील यांनी केले आहे.हा उपक्रम प्रबोध्नात्मक असून यातून पक्षांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे हा उद्देश असल्याचे पाटील यांनी सांगितले.

 

      डोंबिवली शहरातील अनेक ठिकाणी अश्या प्रकारची जलपात्र ठेवली जातात.ओम वायगणकर हा गेल्या तीन वर्षापासून डोंबिवली पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पक्षांसाठी जलपात्र ठेवतो. लहान वयात त्यांचे काम पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.

Post a Comment

0 Comments