आरटीओ कार्यालयात रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनची धडक

  


कल्याण : रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन कल्याण शहर अध्यक्ष प्रणव पेणकर यांच्या निर्देशानुसार आरटीओ कार्यालयात शेकडो रिक्षाचालंकासह पदाधिकारी यांनी धडक दिली. रिक्षा पांसिग योग्यता प्रमाणपत्र शुल्क आँनलाईन तारीख घेतल्यावरही आरटीओ तपासणीत हजारो रुपये दंड आकारणे, मेमो देणे बंद करा या मागणीसाठी यावेळी धडक देण्यात आली.


 दडांत्मक भुर्दडं टाळण्यासाठी आँनलाईन पासिगं तारीख घेतलेल्या पांसिग विना प्रलंबित रिक्षा तातडीने अतिरिक्त वाहन तपासणी निरीक्षक यांची नेमणूक करुन प्रलंबित रिक्षा पासिगं काम निकाली काढा. रिक्षा पांसिग काम या करिता मध्यरात्री पहाटे चार ते पाच व दिवसभर उपासमारी करत मनस्ताप सहन करत ताटकळत वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी व जलद रित्या रिक्षा पांसिग करणे कामी सुव्यवस्था व टोकन पध्दत सुरु करा. प्रलंबित रिक्षा पांसिग जलद रित्या होणे कामी आँनलाईन स्लॉट कोटा वाढ करा.


 रिक्षा पांसिग ट्रॅक वर रिप्लेक्टर पट्टी जादा पैसे घेणे सॅनिटायझरच्या नावे आर्थिक लुट बंद करा.  रिक्षा पांसिग ट्रॅक वर शौचालयपिण्याचे पाणी,  ऊन वारा यापासुन संरक्षण, बसण्याची व्यवस्था शेड मुलभुत सोयीसुविधा उपलब्ध करून द्या. रिक्षा पासिगं संदर्भात रिक्षाचालंकाच्या  विविध अडचणी समस्या बाबंत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली. चव्हाण यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन दखल घेत समस्या अडचणी तात्काळ सोडविण्याचे मान्य केले.


याप्रसंगी सुबल डे,  जाँन कॅलिमिनो,  जितु पवार,  संतोष नवले,  वैभव हरदास,  काका मढवी,  शगीर शेखनूर जमादारबंडु वाडेकर विजय डफळ,  संजय बागवेसंदिप म्हेञे,  हेमंत ठाणगे,  वंसत पाटील,  अनिल जाधव,  सुभाष चव्हाण,  भास्कर बडगुजर,  चंद्रकांत शिंदे,  राजा भालेराव, सुभाष मिरकुटे, शरद पाटील,  राधे चौव्हानअविनाश पाटील आदी पदाधिकारी व रिक्षा चालक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments