कल्याण : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अंबरनाथ शहरामधील महात्मा गांधी महाविद्यालयामध्ये विद्यार्थिनींसाठी "वैयक्तीक स्वच्छता" व खुला संवाद या विषयावर सत्र ठेवण्यात आले. या सत्राच्या वक्ता कल्याण शहर एसएफएस प्रमुख स्नेहा शिर्के या होत्या. या सत्रासाठी १३० हून अधिक विद्यार्थिनींची उपस्थिती होती.
या सत्रासाठी महात्मा गांधी महाविद्यालयाच्या उप मुख्याध्यापिका सुप्रिया गोसावी या सुद्धा उपस्थित होत्या. तसेच अभाविपचा परिचय कार्यक्रम प्रमुख भूमिका देशपांडे यांनी केला. सत्रामध्ये विषयाची इत्यंभूत माहिती व विद्यार्थिनींचे प्रश्न सुद्धा सोडवण्यात आले तसेच परिषदेचा परिचय व उन्हाळी शिबिराची माहिती देण्यात आली.
0 Comments