पीव्हीआर सिनेमा कंपनी कॉलसेंटरला मराठीच वावडं मनसे आक्रमक


डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवलीजवळील   पीव्हीआर  सिनेमा कंपनीच्या कॉलसेंटर मध्ये मराठी भाषा नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला आहे. मराठी भाषेचा मान राखा अन्यथा मनसे स्टाईलने पुढील आंदोलन करू असा इशारा मनसैनिकांनी व्यवस्थापणाला दिला.एका प्रेक्षकाने  जाब  विचारला असता व्यवस्थापनाने समाधानकारक  उत्तरे दिली नाहीत.याची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांना मिळताच  मनसैनिकांनी एक्सपीरिया मॉलमधील  पीव्हीआर कंपनीच्या व्यवस्थापनालाजाब विचारला.


                यावेळी मनसेचे उपजिल्हा सचिव अनंता म्हात्रे, डोंबिवली शहर संघटक योगेश पाटील, हरीष पाटील,डोंबिवली शहर सचिव अरुण जांभळे, मनसे विभाग अध्यक्ष रक्षित रायकर, रोहित भोईर, माजी नगरसेवक प्रभाकर जाधव, प्रतिभा पाटिल, सपना पाटील, यांसह अन्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.  मराठी भाषेला मान दिला नाही तर यानंतरचे आंदोलन तीव्र असेल असा इशारा देण्यात आला. 

Post a Comment

0 Comments