देवराई जंगलात वीणा गवाणकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

  


कल्याण : "अवघा देहची वृक्ष जाहला" या वृक्ष संवर्धक रिचर्ड वेकर यांच्या चरित्रावर वीणा गवाणकर लिखित पुस्तकाचा प्रकाशन टिटवाळा नजीक रुंदे येथील पर्यावरण दक्षता मंडळच्या देवराई या जंगलात नुकताच संपन्न झाला.


पर्यावरण दक्षता मंडळाने लोक सहभागातून टिटवाळा जवळच्या रुंदे गावाजवळील ५० एकर वर देवराई ची निर्मिती केली आहे. या देवराईत हा कार्यक्रम संपन्न झाला. सकाळी ७ वाजता येथील जंगलात भटकंती आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थितांना तेथील वनस्पतीकिटकपक्षी याची माहिती पौर्णिमा शिरगावकर यांनी करून दिली. यानंतर पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम सुरु झाला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ. मानसी जोशी यांनी खुमासदारपणे केले.


 या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वालावलकर यांनी सर्वांना कृतीशील होण्याचे आवाहन केले. पर्यावरण क्षेत्रात निरंतर संशोधनाच्या संधी आहेत त्या ओळखून आपण सर्वांनी या प्रवाहात सामील होण्याची विनंती त्यांनी या वेळी केली. संस्थेच्या सचिव आणि देवराई प्रकल्पाच्या प्रमुख संगीता जोशी यांनी देनेच्या सुरवातीपासून '५ वर्षांचा प्रवास आलेल्या अडचणीआव्हानात्मक परिस्थिती, स्थानिक बाबींशी जुळवून घेत लोकसहभागातून उभारलेल्या २५००० झाडांविषयी माहिती दिली. या उपक्रमात अनिल ठाकरे यांचे लाभलेले अमूल्य मार्गदर्शनाचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. झाडांची निवड करतांना जैव विविधता वाढावी तसेच स्थानिक भारतीय झाडांना प्राधान्य दिल्याचेही त्यांनी नमूद केले.


अनेक प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा अनेक निसर्गप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. ज्येष्ट लेखिका वंदना अत्रेलेखक दीपक पणशीकरजिराफ अभ्यासक तुषार कुलकर्णी, हत्ती अभ्यासक आनंद शिंदेकल्याण आणि डोंबिवलीतील सायकल क्लब चे प्रतिनिधी तसेच अनेक बालगोपालांनी यावेळी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला.

Post a Comment

0 Comments