ठाणे कशेळी अंजुरफाटा रस्त्याच्या दुरावस्थे विरोधात रास्तारोको , केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला संताप


भिवंडी दि 19  (प्रतिनिधी ) ठाणे कशेळी अंजुरफाटा वडपे या बीओटी तत्वावर विकसित केलेल्या रस्त्याची मागील कित्येक वर्षां पासून दुरावस्था झाली असून त्याकडे राज्य शासनाचे लक्ष नसल्याने वाहतूकदारांना टोल भरून खराब रस्त्यावरून प्रवास करावा लागत असल्याने नागरीक हवालदिल झाले असून या विरोधात भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीधर पाटील यांनी रास्तारोको व टोल बंद व मेट्रो काम बंद आंदोलन पुकारले होते या आंदोलनात केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांन सह शेकडो कार्यकर्ते विद्यार्थी सहभागी झाले होते.या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे अर्धा तास विस्कळीत झाली होती.त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करीत वाहतूक सुरळीत केली.


           ठाणे भिवंडी रस्त्यावरील कशेळी ते अंजुरफाटा या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून याच रस्त्यावर ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो प्रकल्प 5 चे काम सुरू असल्याने रस्त्याची अवस्था दैनिय झाली आहे.विशेष म्हणजे रस्त्यावर टोल वसुली सुरु असून ही रस्ते दुरुस्ती बाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व एमएमआरडीए एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याने रस्त्याची दुरावस्था होवुनण्याचा त्रास या मार्गावरील वाहन चालक ,चाकरमानी ,विद्यार्थी यांना होत आहे त्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नागरीकांच्या सहकार्याने रास्तारोको आंदोलन पुकारण्यात आले होते.या आंदोलनाचे नेतृत्व केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले .        भिवंडी तालुक्यातील सर्वच बीओटी च्या माध्यमातून विकसित केलेल्या रस्त्यांची दुरावस्था झाली असताना राज्य सरकार या प्रश्नांकडे हेतुपुरसार दुर्लक्ष करीत असून राष्ट्रवादी व कॉंग्रेस आघाडी काळात हे रस्ते राष्ट्रवादीच्या तत्कालीन मंत्र्यांच्या अत्यंत जवळच्या माणसांना या रस्त्यांची कामे दिल्याने निकृष्ट दर्जाची कामे झाली असून या आंदोलना नंतर 15 दिवसात परिस्थिती सुधारली नाही तर अधिक उग्र आंदोलन नागरीक रस्त्यावर उतरून करतील असा इशारा कपिल पाटील यांनी दिला.

Post a Comment

0 Comments