हेदुटने येथे राष्ट्रीय विज्ञान दिवसा निमित चमत्कार सादरी करण


डोंबिवली ( शंकर जाधव ) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यां पर्यंत विज्ञान दिवसाचे महत्व पोहचावे या उद्देशाने  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणें जिल्हा तर्फे हेदुटने येथील जिल्हा परिषद शाळेत २८ फेब्रुवारी  विज्ञान दिनानिमित्त चमत्कार सादरीकरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

    
             प्रत्येक  कथित चमत्कारामागे एकतर हात चलाकी असते किंवा विज्ञान असते हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सांस्कृतिक विभागाचे सदस्य  राजू कोळी यांनी या विद्यार्थ्यांसमोर वेगवेगळे प्रयोग सादर करून समजावून सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना  विजय गमरे यांनी कार्यक्रमाचा उद्देश समजावून सांगितला.


           त्यानंतर कोळी यांनी नजरबंदी, भूतबाधा , करणी काढणे, पाण्यावर दिवा प्रज्वलित करणे, हवेत हात फिरवून अंगारा काढणे असे प्रयोग विद्यार्थ्यांसमोर सादर केले व त्या पाठीमागील हातचलाखी व विज्ञान दोन्ही गोष्टी समजावून सांगितल्या.या कार्यक्रमाला सरपंच  तकदीर काळण , समाज सेवक अखलेश काळण  उपस्थित होते. 


           शाळेचे मुख्याध्यापक भरत चव्हाण, अर्चना मिलगीरे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये विशेष पुढाकार घेतला.
 या कार्यक्रमात  दिलीप भगत, वैशाली शेवाळे,  प्रीती अहिरे यांच्यासह अनेक शिक्षक सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments