राष्ट्रीय लोकन्यायालयात ठाणे जिल्हा न्यायालयात २२ हजार ६७८ प्रकरणांत तडजोड


ठाणे,दि. १५ ( जिमाका) : येथील जिल्हा न्यायालय आणि ठाणे व पालघर जिल्ह्यातील न्यायालयात शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण १० हजार ३८० प्रलंबित व १२ हजार २९८ दाखलपूर्व अशा एकूण २२ हजार ६७८ प्रकरणांमध्ये तडजोड झाली, अशी माहिती ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव  एम. आर. देशपांडे यांनी  दिली. 


           प्रलंबित प्रकरणांमध्ये एकूण ४४ कोटी ८८ लाख ४६ हजार ४२९ रुपये व दखलपूर्व प्रकरणांमध्ये एकूण रू ५ कोटी ३८ लाख ३२ हजार ९०२ रुपये अशी एकूण रु. ५० कोटी २० लाख ७९ हजार ३३२ रुपये एवढया रकमेचा समावेश असलेली प्रकरणे लोकअदालतीमध्ये तडजोडीने मिटली. 


             मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणात एकूण २३९ प्रकरणांत तडजोड झाली. पिडीतांना रक्कम २१ कोटी २९ लाख ९९ हजार ६६४ रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. सदर प्रकरणांपैकी ठाणे मुख्यालयात एकूण १७७ प्रकरणांमध्ये तडजोड होवुन १४ कोटी १६ लाख ९२ हजार ६६४ रुपये एवढी नुकसान भरपाई पिडीतांना मंजुर करण्यात आली.


          राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशाप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे व जिल्हा व सत्र न्यायालय, ठाणे येथे प्रलंबित व वादपूर्व प्रकरणांचे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, ठाणे श्री. अभय ज मंत्री यांचे मार्गदर्शनाखाली झाल्याचे श्री. देशपांडे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments