राष्ट्रीय स्तरावरील आंतर महाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धेत एसएसटीची बाजी


कल्याण : मुंबईतील गुरुकुल कॉलेज ने नुकत्याच आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील आंतरमहाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धेत उल्हानसगर मधील एसएसटी  कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.


या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यात दिल्लीजयपूर,पुणे,पंजाब येथून टीम सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत एसएसटी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या 'बालविवाहया पथनाट्याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. या पथनाट्यात प्रज्ञा चव्हाणवैभवी अहिररावश्रद्धा अहिरेमुस्कान केसरियामनीष हटकर,नरपत लखारा,अभय राजपुत,योगेश ठाकूर हे विद्यार्थी सहभागी होते. 


या पथनाट्याचे दिग्दर्शन हर्षल सूर्यवंशी यांनी केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष आणि संस्थापक प्राचार्य डॉ.पुरस्वानीउपप्राचार्या डॉ.खुशबू पुरस्वानीसर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.


Post a Comment

0 Comments