कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मृतीदिनी महानगर पालिके तर्फे आदरांजली


कल्याण : कल्याण डोंबिवली परिसरातील डोंबिवली शहरात राहणारे शूरवीर कॅ.विनयकुमार सचान यांना  मातृभूमीच्या रक्षणासाठी काश्मीर मध्ये दहशतवाद्यांशी लढताना २४ मार्च २००३  रोजी  वीरमरण आले. त्यामुळे २४ मार्च या दिवशी  कॅ.विनयकुमार सचान यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महापालिकेतर्फे डोंबिवली येथील  वै.ह.भ.प. श्री.सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडा संकुलातील त्यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात येते. आजही कॅ. विनय कुमार सचान यांच्या स्मृतीदिनी  महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी  यांनीत्‍यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली.


यावेळी उपस्थित कॅ. विनयकुमार सचान यांचे माता-पिताबहिण तसेच महापालिकेच्या विभागीय उपायुक्त पल्लवी भागवतमहापालिका सचिव  संजय जाधवकार्यकारी अभियंता विजय पाटीलमाहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळेसहा.आयुक्त राजेश सावंतउप अभियंता शैलेश मळेकर यांनी देखील कॅ.विनयकुमार सचान यांच्या स्मारकास पुष्पसुमने अर्पण करून आदरांजली वाहिली. यासमयी इतर अधिकारी,कर्मचारी वर्ग तसेच कॅ. विनयकुमार सचान यांचे नातेवाईक व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments