जनरल एज्यूकेशन इन्स्टिीट्युटच्या उपाध्यक्ष पदी मिलिंद कुलकर्णी


कल्याण : सार्वजनिक वाचनालय कल्याणचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी यांची जनरल एज्यूकेशन इन्स्टिीट्युट या संस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत `उपाध्यक्ष पदावर बिनविरोध निवड झाली. सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदाची धुरा नुकताच हाती घेतल्यानंतर आता या पदासाठीही ते सज्ज झाले आहेत.

 

         ठाणे जिल्ह्यातील रोटरी क्लबचे डिस्ट्रीक गव्हर्नर म्हणूनही ते काम पाहतात. कल्याणमधील अनेक शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातही ते मोलाची कामगिरी पार पाडीत आहेत. जनरल एज्यूकेशन इन्स्टिीट्युट ही महाराष्ट्रातील नामवंत शैक्षणिक संस्था असून अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात अग्रणीची भूमिका बजावित आहे. 


         मिलिंद कुलकर्णी यांच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडीमुळे समस्त कल्याणकरांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असल्याची माहिती सरचिटणीस भिकू बारस्कर यांनी दिली.


Post a Comment

0 Comments