पुणे ड़िस्ट्रिक्ट ॲन्ड मेट्रोपाॅलिटन बॅडमिंटन असोसिएशन स्पर्धेत मनालीचे सुयशडोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवलीतील एमआयड़ीसी तील मिलापनगर भागात राहणाऱ्या मनाली प्रशांत परूळेकर (१४) या  विद्यार्थिनीने पुणे येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या पुणे ड़िस्ट्रिक्ट ॲन्ड मेट्रोपाॅलिटन बॅडमिंटन असोसिएशन स्पर्धेत यश संपादन केले आहे. तिने खुल्या गटातून हे यश संपादन केले.  


          अल्पवयात तिने हे यश संपादन केल्याने तिचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. पुणे डिस्ट्रिक्ट मेट्रोपाॅलिटन बॅडमिंटन असोसिएशन स्पर्धा पुणे येथे आयोजित केली होती. राज्याच्या विविध भागातील बॅडमिंटन स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. डोंबिवलीची मनाली परूळेकर या स्पर्धेत सहभागी झाली होती. 


       गेल्या पाच वर्षापासून मनाली राज्यस्तरिय बॅडमिंटन स्पर्धेत खेळते. विविध राज्यात झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेत तिने यश संपादन केले आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून तिने अनेक बक्षिसे मिळवली आहेत. एमआयडीसीतील सेंट जोसेफ शाळेत ती इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेते. पुणे येथील निखिल कानिटकर बॅडमिंटन ॲकेडेमीमध्ये ती नियमित सरावासाठी जाते. 

 
        कुटुंबीयांचा पाठींबा, प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन यामुळे आपणास हे यश मिळाले, असे ती सांगते.. या पुढील काळात आपणास राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सहभागी होऊन देशाचे नेतृत्व, नाव उज्जवल करता येईल यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे मनाली परूळेकर हिने सांगीतले.

Post a Comment

0 Comments