भारतीय संविधान विषयावर कायदा साथीची निबंध स्पर्धा


कल्याण : भारतीय संविधान व कायदा या बद्दल प्रचारप्रसार करण्यासाठी व कायद्याची मदत गोरगरीबांना मिळवून देण्यासाठी जेष्ठ समाजसेवक किशोर गणाई यांनी युवा वकीलांची कायदा साथी संस्था स्थापन केली. संस्थेच्या अध्यक्षा ॲड पुजा बडेकर यांनी कायदा साथी तर्फे भारतीय संविधान या विषयावर  श्रीमती कमल वसंत जाधव निबंध स्पर्धा आयोजित केली असल्याची माहीती कार्यवाह मंजिरी धुरी यांनी दिली.


इच्छुक स्पर्धकांनी आपला निबंध मराठी भाषेत ३ मार्च पर्यंत किमान दोन हजार  शब्दात  kayadasathi@gmail.com या मेलवर मेल करायचा आहे. याकरिता शुद्धलेखनापेक्षा आशयाला अधिक महत्व दिले जाणार आहे असे कार्यालयीन सचिव शुभम राऊत यांनी सांगितले. प्रथम पारितोषिक ५ हजार तर द्वितीय पारितोषिक ३ हजार व तृतीय पारितोषिक २ हजार तर ५०० रुपयांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके असल्याची माहिती खजिनदार आरती गुप्ता यांनी दिली .


श्रीमती कमल वसंत जाधव निबंध स्पर्धेचा पारितोषिक समारंभ १४ एप्रिल आंबेडकर जयंतीचा दिवशी होईल व त्याचे स्वरूप व नियोजन स्पर्धकांना कळविण्यात येईल अशी माहिती सलोनी तोडकरी यांनी दिली. अधिक माहितीसाठी 77981 99205/ 80978 34167/ 8104571787 वर संपर्क करावा असे संयोजक  राहुल भाट यांनी आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments