लेखकाची शोधयात्रा म्हणजे लेखन - संमेलनाध्यक्ष भारत सासणे

■सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांचा सत्कार


कल्याण : भ्रमयुगात सत्य-असत्य यांतील भेद जाणण्यासाठी मनुष्य आंधळ्या प्रवासात निघतो त्याचा शोध लेखक घेतो. सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून लेखकाने लेखन करुन विधायक भूमिका पार पाडावी असे मत उदगीर येथे होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी व्यक्त केले.


सार्वजनिक वाचनालय कल्याण व कल्याण डोंबिवली महानगरपालिका संयुक्त विद्यमाने पुमा.भावे व्याख्यानमाले अंतर्गत ९५ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे, मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून कृत्रिम बुद्धिमत्ता विशेषज्ञ पुरस्काराने सन्मानित झालेले कासम शेख यांचा सत्कार वाचनालयाच्या सभागृहात आयोजित केला होता. याप्रसंगी क.डो.म.पा उप-आयुक्त बाळासाहेब चव्हाणवाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, सरचिटणीस भिकू बारस्कर, कवी अरुण म्हात्रे उपस्थित होते.


लेखक जेव्हा अबोध मनाचा शोध घेतो. भोवतालच्या जाणीवेतून नेणिवेत जातो तेव्हा ती पात्र त्याच्या साहित्यकृतीत येतात. हाच लेखकाचा आत्मशोध असतो त्यातूनच लेखक सुखाचा मूलमंत्र देण्याचा प्रयत्न करीत असतो. सामाजिक अंगाने सामान्य माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच साहित्य संमेलन ही समाजाची गरज असून बौद्धिक उपक्रम त्या ठिकाणी होणे गरजेचे आहे. कल्याण शहरातील चिंतामणराव वैदय (भारताचार्य)हे साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष असून त्याच्या छायाचित्रांचे दालन आगामी संमेलनात उभे करण्याचा प्रयत्न करू असे प्रतिपादन भारत सासणे यांनी केले.


कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे उप-आयुक्त बाळासाहेब चव्हाण म्हणाले कि, मराठवाड्याचे सुपुत्र आहात. प्रशासकीय सेवा करतानाच लेखन प्रपंच सांभाळणे कठीण आहे. त्याबद्दल भारत सासणे यांचे अभिनंदन केले तसेच साहित्यिक परंपरेबरोबरच विज्ञान युगातील कल्याणकरांसाठी संपूर्ण जगतासाठी कासम शेख यांना शुभेच्छा दिल्या तसेच 'कल्याण- डोंबिवली दर्शन परिवहन सेवेच्या उपक्रमात सार्वजनिक वाचनालय कल्याणचा अंतर्भाव करण्या संदर्भात प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.         अनेक साहित्यिक संस्था व वाचनालयांनी सत्कारमूर्ती भारत सासणे यांच्या सत्कारात सहभाग
 घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जितेंद्र भामरे यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी वाचनालयाचे विश्वस्त प्रशांत मुल्हेरकर, कार्यकारीणी सदस्य अरुण देशपांडे, डॉ.सुहास चौधरी, अरविंद शिंपी कार्यकारिणी सदस्या निलिमा नरेगलकर, डॉ. अमिता कुकडे, परिघा विधातेवाचक वर्ग तसेच वाचनालयाच्या ग्रंथसेविका आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments