निरक्षर स्त्रियांनी जपलेला अक्षर धनाचा सुरेख आविष्कार म्हणजेच स्त्रीधन होय दिपाली केळकर


भिवंडी, प्रतिनिधी  :  लौकिक अर्थाने अनेक स्त्रिया त्या वेळेला निरक्षर असूनही जीवनाचा अनुभवातून आलेल्या विचारांना ओवीबद्ध करून स्त्रियांनी मराठी भाषा आणि साहित्य समृद्ध केले. 


          मराठी भाषेच्या अभिजात श्रीमंती यांची ओळख करून सांगितले की,  निरक्षर स्त्रियांनी जपलेल्या अक्षर धनाचा सुरेख आविष्कार म्हणजेच स्त्रीधन होय असे उद्गार  सुसावांदिका लेखिका दीपाली केळकर यांनी काढले. वाचन मंदिर संस्थेच्या 159 व्या वर्धापन दिननिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात टिळक मंदिर सभागृहात  त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी  संस्थेचे अध्यक्ष सुधीर सींगासणे होते.


        वाचन मंदिर संस्थेच्या 159 व्या वर्धापन दिन  कार्यक्रमात त्या स्त्रीधन या विषयावर बोलत होत्या . दिपाली केळकर यांनी अनेक पौराणिक संदर्भ देत निरक्षर स्त्रियांनी जपलेल्या साहित्याचे हे धन किती अमूल्य आहे याची श्रोत्यांना ओळख करून दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माहेर या शब्दाच्या उत्पत्तीपासून या शब्दाचे निगडित हळुवार आठवणी विविध दाखले देत  केळकर यांनी श्रोत्यांना रममाण केल.


          जानपद, रुख्वतीचे, फुगडीचे, उखाणे, आणि रंजक कोडी यांच्या माध्यमातून रसिकांशी संवाद साधला.पूर्वीच्या काळात बायकांचा निसर्गाशी  सहज संवाद होता, निसर्गाशी जवळीक, तसेच जातं, उखळ, दळण, कांडण, घुसळण करताना  त्या सहज गाणं गुणगुणत आपलं मनोरंजन करत असत, त्यामुळे त्यांना कधी मानसोपचाराची गरज पडली नाही. 


          त्यांनी निर्माण केलेली ही सहज सुचलेली गाणी हे लोकसाहित्य समृद्ध भांडार आहे. इंदिरा संत बहिणाबाई, शांताबाई शेळके, सरोजिनी बाबर इत्यादी साहित्यिकांनी हे लोकसाहित्य समृद्ध करून हे स्त्रीधन जतन करण्यास मोठा हातभार लावला आहे. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला वाचन मंदिर संस्थेचे  सहकार्य मिलिंद पळसुले यांनी प्रास्ताविक केले, तर राधा जोशी यांनी खुमासदार शैलीत वक्त्यांचा परिचय करून दिला. 


        तर अंजली घुगरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यवाह  किशोर नागवेकर, खजिनदार उज्वल कुंभार, मयुरेश घुले,  योगेश वल्लाल, ग्रंथपाल शलाका मदन, प्रणाली खोडे आणि सतीश जाबरे यांनी विशेष मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments