कल्याण : स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचा प्रथम वर्धापन दिन व पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाचे औचित्य साधून मुरबाड येथे नुकतेच राष्ट्रीय सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात विविध क्षेत्रात सामाजिक हिताचे भान राखून अनमोल असे योगदान देणार्या अनेक सेवाभावी व्यक्ती - समाजसेवकांचा 'राष्ट्रीय समाज रत्न पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आला.
मुरबाड तालुक्यातील कुणबी समाज हॉल, म्हसा रोड मुरबाड येथे या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या अनमोल अशा योगदानाची दखल घेऊन एनजीओ मार्फत अत्यंत मानाचा असा 'राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार ' उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे, कल्याणच्या उत्कृष्ट वृत्तनिवेदिका व समाजसेविका ललीता मोरे, परेल मुंबईच्या श्यामा पवार, वाशी नवी मुंबईतील संपादक संजय सावंत या सारख्या अनेक व्यक्तिंना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
कार्यक्रमास राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार, राष्ट्रीय महिला अध्यक्ष ज्योती शेलार, राष्ट्रीय उपाध्यक्ष गौरव शेलार, मुंबईचे पोलीस अधिकारी रामदास अहिरे, पंजाबचे अध्यक्ष अमन मेहरा, रजनी सिंग, हायकोर्टचे वकील सुधीर लंभाटे, राष्ट्रीय प्रवचनकार महाराज निलेश कोरडे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा गौरव सोहळा संपन्न झाला.
0 Comments