एक्स्ट्रा मार्क्स द्वारे सर्व समावेशक 'दि टिचिंग अॅप' लॉंच


मुंबई, २७ मार्च २०२२: दर्जेदार शिक्षण सोल्यूशन्स देण्यामध्ये १२ वर्षांहून अधिक काळाच्या कौशल्याचा लाभ घेत एक्स्ट्रामार्क्सने प्रगत अध्यापन व्यासपीठ 'दि टिचिंग अॅप' लॉंच केले आहे, जे देशभरातील शालेय शिक्षक, खाजगी शिक्षक, होम ट्युटर्स व कोचिंग स्‍टाफला लाइव्ह क्लासरूम अध्यापन अनुभवाचा लाभ देते.


        अध्यापनाला नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा मनसुबा असलेले एक्स्ट्रामार्क्स – दि टिचिंग अॅप हे सर्व अध्यापन गरजांसाठी सर्वांगीण सोल्यूशन आहे. अत्‍याधुनिक अध्यापन तंत्रज्ञान असलेले एक्स्ट्रामार्क्स-दि टिचिंग अॅप शालेय शिक्षक व होम ट्युटर्सना एकाच व्यासपीठावर त्यांचे संपूर्ण लाइव्ह क्लासेस वेळापत्रक निर्माण, व्यवस्थापन करण्यासोबत देखरेख ठेवण्यासाठी, तसेच आवश्यक व मॅन्युअल डॉक्युमेन्टेशन टास्क्स आपोआपपणे करण्यासाठी सक्षम करते. अॅप शिक्षकांना एक्स्ट्रामार्क्स कोषामधील लाखोहून अधिक प्रश्न उपलब्ध करून देण्यासह मूल्यांकन तयार, नियुक्त व सानुकूल करण्यामध्ये मदत करते. अॅप संपूर्ण अध्यापन अनुभव परस्परसंवादी, सर्वसमावेशक व मजेशीर करण्यासाठी सानुकूल नोटिफिकेशन्सची सुविधा देखील देते.


         एक्स्ट्रामार्क्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रित्विक कुलश्रेष्ठ म्हणाले, "स्थापनेपासून एक्स्ट्रामार्क्स सातत्यपूर्ण नवोन्मेष्काराच्या माध्यमातून अध्यापन-अध्ययन क्षेत्रामधील मुलभूत समस्यांचे निराकरण करण्यामध्ये सक्रियपणे सहभागी आहे. टिचिंग अॅप प्रगत अध्यापन व्यासपीठासाठी गरजेची पूर्तता करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. भारतात शालेय शिक्षक, स्वतंत्र शिक्षक, कोचिंग स्टाफ, कंत्राटदार व खाजगी शिक्षक असे अनेक शिक्षकांचा भरणा आहे आणि त्यांच्या संपूर्ण अध्यापन प्रवासाचे डिजिटायझेशन करून त्यांना एकाच व्यासपीठावर आणल्यास त्यांची पोहोच, व्यावसायिक विकास आणि विद्यार्थ्यांसोबतचा सहभाग वाढेल. 


     हे अॅप उलब्धता, सहभाग व सातत्यपूर्ण शिक्षणासंदर्भातील सर्व किरकोळ आव्हानांचे निराकरण करते. शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेत हे अॅप अध्यापन अनुभव परस्परसंवादी आणि समजण्यास सुलभ करण्याकरिता डिझाइन करण्यात आले आहे. आम्हाला या व्यासपीठाबाबत व्यापक आशा आहे आणि आमचा विश्वास आहे की, यामुळे आंतरशहरीय अध्यापनाचे नवीन मार्ग खुले होतील."

Post a Comment

0 Comments