जेनेरिक आधारचे ४०० हून अधिक महिला उद्योजकांना प्रोत्साहन औषध निर्मिती क्षेत्रात फ्रँचायझी संधी प्रदान केली ~मुंबई, ७ मार्च २०२२ : वयाचा १६ व्या वर्षी तरुण उद्योजक अर्जुन देशपांडे यांनी स्थापन केलेल्या भारतातील सर्वात वेगाने वाढणारी फार्मा कंपनी जेनेरिक आधारने भारतभरातील ४०० हून अधिक महिलांना फ्रँचायझी संधी प्रदान करून, त्यांना औषधनिर्मिती क्षेत्रातील त्यांच्या उद्योजकीय प्रवासात मदत करून आणखी एक टप्पा गाठला आहे. 


       उद्योग जेनेरिक आधार त्याच्या अद्वितीय अशा फार्मसी-एग्रीगेटर बिझनेस मॉडेलद्वारे मार्केटिंग, वितरण, साठवणूक आणि पुरवठा या मधल्या-साखळीचा खर्च दूर करून, उत्पादकांकडून थेट अंतिम वापरकर्त्यांना ८०% पर्यंत सवलत देऊन उच्च-गुणवत्तेची औषधे प्रदान करते.


       जेनेरिक आधार महिलांच्या सक्षमीकरणाला त्यांच्यासोबत शाश्वत व्यवसाय मॉडेल चालवण्याच्या समान संधी प्रदान करून थेट समर्थन करते. ते केवळ महानगरातील महिलांनाच पाठिंबा देत नाहीत तर ग्रामीण भागावरही लक्ष केंद्रित करत आहेत. सध्या, मुंबई, दिल्ली, बंगलोर, हैद्राबाद इत्यादी मोठ्या शहरांसह बिरभूम, चिदंबरम, महू इ.सारख्या दुर्गम गावांसह प्रत्येक राज्यात जेनेरिक आधार फ्रँचायझीचा महिला उद्योजक आहेत.


     जेनेरिक आधारचे संस्थापक आणि सीईओ श्री अर्जुन देशपांडे म्हणाले, "उद्योजकता ही काळाची गरज आहे. मला विश्वास आहे की महिला भारतीय आर्थिक विकासाच्या सर्वात मोठ्या स्तंभांपैकी एक असतील. आमच्या उपक्रमाद्वारे आम्ही केवळ रोजगार निर्माण करत नाही तर उद्योजकही निर्माण करत आहोत. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याच्या संधी शोधणाऱ्या महिला उद्योजकांसाठी आमचे आत्मनिर्भर प्रकल्प आदर्श आहे. 


      देशाच्या सर्वांगीण विकासात महिलांचा मोठा वाटा आहे यावर आमचा ठाम विश्वास आहे. २०१९ मध्ये आमची स्थापना झाल्यापासून आम्ही ४०० हून महिला उद्योजक तयार केले आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो. महिलांनी उदयास येण्याची, नाव कमावण्याची आणि आपल्या देशाच्या विकासात आघाडीवर राहून योगदान देण्याची हीच योग्य वेळ आहे.”

   

       जेनेरिक आधारला जगभरात त्याच्या उदात्त ध्येयासाठी आणि दूरदृष्टीसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धि मिळाली आहे. हे औषध उद्योगातील सर्वात मोठे आव्हान तर सोडवत आहेच पण या परिवर्तनाच्या प्रवासात देशातील महिलांचे नेतृत्व करत आहे.

Post a Comment

0 Comments