राष्ट्रवादीच्या मोरेश्वर तरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन


कल्याण : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक दहा टिटवाळा अध्यक्ष मोरेश्वर तरे यांच्या नारायण नगर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष वंडार पाटील यांच्या हस्ते करण्यात आलेयावेळी कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासेप्रदेश सदस्य जेसी. कटारियामाजी नगरसेवक वासुदेव पाटीलजिल्हा महिला निरीक्षक माया कटारियाजिल्हा उपाध्यक्ष विनायक काळण, अनिल तरे आदी मान्यवर उपस्थित होते.


       यावेळी शिवशंभो प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष वंडार पाटील यांनी सांगितले की टिटवाळा येथील राष्ट्रवादीचे अध्यक्ष मोरेश्वर तरे हे हाडाचे कार्यकर्ते आहेतजनसेवक महणून अनेक वर्षे काम करीत आहेत. कोरोना काळावधीत गोरगरिबांना मदत केली आहे. अशा जनसेवकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे व त्याना महापालिकेच्या निवडणूक मध्ये विजयी केले पाहिजे असे आवाहन केले.यावेळी प्रिमियर लिग स्पर्धेत बंक्षीसे मिळविणाऱ्या तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व सर्पमित्र यांचा सत्कार करण्यात आला.


या उद्घाटना प्रसंगी  भगवान साठेरमेश रोकडेअ प्रभाग अध्यक्ष गणेश कोनकरप्रभाग क्रमांक दहा अध्यक्ष मोरेश्वर तरे, प्रभाग क्रमांक आठ अध्यक्ष महेश भोय, प्रभाग क्रमांक नऊ अध्यक्ष दिपक कांबळेमुस्तफा सय्यदजमाल शेख,विजय भोईरमोहन तरेप्रसाद दलालभरत  बेडसेशिवशंभो प्रतिष्ठानचे अनिरुद्ध कुळकर्णीमोरेकल्याण पश्चिम विधानसभा महिला अध्यक्षा सुनिता देशमुख,  कल्याण पूर्व अध्यक्षा मिनाक्षी आहिरेसुनंदा देसेकर, सुनंदा भांगरेसोनाली तरेवैष्णवी शिर्के यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कायेकतै मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अँड सागर वाकले यांनी केले. तर पाहुण्यांचे स्वागत वार्डअध्यक्ष मोरेश्वर तरे यांनी केले.

Post a Comment

0 Comments