पातलीपाडा येथे टाटा मोटर्सच्या अद्ययावत शोरूमचे अनावरण डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि राजन आंबा यांची उपस्थिती

 


ठाणे  (प्रतिनिधी) -:   हेरिटेज मोटर्सच्या नवीन शाखेचे दिमाखदार उद्घाटन आज पातलीपाडा येथे करण्यात आले. यावेळी गृहनिर्माण मंत्री ना.डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि टाटा मोटर्सचे उपाध्यक्ष राजन आंबा हे उपस्थित होते. 


       घोडबंदर रोड परिसरातील  लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढीस लागली आहे. या भागात टाटा मोटर्सच्या वाहनांच्या विक्रीचे केंद्र नसल्याने हेरिटेज मोटर्सचे संचालक सुरेंद्र उपाध्याय आणि संतोष तिवारी यांनी हे नवीन शो रूम पातलीपाडा येथे सुरू केले आहे. आज या शोरूमचे उद्घाटन गृहनिर्माण मंत्री ना.डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि टाटा मोटर्सचे उपाध्यक्ष राजन आंबा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे आदी उपस्थित होते.

 

       या ठिकाणी टाटा कंपनीच्या सर्व प्रकारच्या चारचाकी गाड्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे चार्जिंग वाहनांचे विशेष दालनही या ठिकाणी करण्यात आले आहे.  तसेच, वाहन कर्ज मिळवून देण्यासाठीही स्वतंत्र कक्ष निर्माण केला आहे.

Post a Comment

0 Comments