भिवंडीत केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त साजरा केला कपिलोत्सव ! हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित..


भिवंडी दि 5 (प्रतिनिधी )  केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘कपिलोत्सव‘ हा भव्य कार्यक्रम अंबाडी इथं पार पडला. या कार्यक्रमाचे उदघाटन महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. या निमित्ताने महारक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर आणि महिला मेळावा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. विशेषतः महिलांची संख्या उल्लेखनीय होती.


          याप्रसंगी श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित आणि कुणबी सेना अध्यक्ष विश्वनाथ पाटील हे उपस्थित होते. तसेच विशेष आकर्षण म्हणून सिने अभिनेत्री प्रार्थना बेहरे उपस्थित होत्या.या निमित्त लकी ड्रॉ चे आयोजन करून त्या मधील विजेत्यांना पैठणी ,मोबाईल ,इलेक्ट्रिक बाईक यांची भेट देण्यात आली.या कार्यक्रमाचे आयोजन भाजयू मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य देवेश पाटील, कपिल पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सभागृहनेते सुमित पाटील यांनी नियोजन बद्ध केले होते. 


          या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी लकी ड्रॉ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. लकी ड्रॉच्या माध्यमातून निवड करून महिलांना इलेक्ट्रिक स्कुटर, पैठणी साडी, मोबाईल अशी पारितोषिके देण्यात आली. तसेच आरोग्य शिबिरात अनेक नागरिकांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले. अभिनेत्री प्रार्थना बेहरे सह अभिनेता अंशुमन विचारे, विनोदी अभिनेते प्रभाकर मोरे अभिनेत्री सुहास परांजपे इ. मराठी कलाकारही उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments