कल्याणात महावितरण कंपनीच्या इमारतीसमोर १४३० जण संपात सहभागी


डोंबिवली ( शंकर जाधव ) महावितरण, महापारेषाण आणि महानिर्मिती कंपन्यांमध्ये केंद्र सरकारच्या प्रस्तावित खासगीकरण धोरणाला विरोध व विविध प्रलंबित मागण्यांसाठी वीज कर्मचारी, अधिकारी व अभियंता संघटना कृती समितीकडून दोन दिवसांचा संप सुरू केला आहे.कल्याण परिमंडलातील तेजश्री महावितरण कंपनीच्या  इमारतीसमोर महावितरणच्या कर्मचाऱ्यांची निदर्शने व धरणे आंदोलन दिवसभर सुरू होते. 


        संपात जवळपास ६० टक्के कर्मचारी संपात सहभागी होते. नियमित आणि कंत्राटी एकूण २५००  कर्मचाऱ्यांपैकी १४३० जण पहिल्या दिवशी संपात सहभागी झाले. संपाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता कृती समितीकडून तेजश्री इमारतीसमोर आंदोलनाला सुरुवात होणार आहे.


         संपात सहभागी संघटनांच्या पदाधिकारी आणि प्रतिनिधींनी खासगीकरणाला कडाडून विरोध केला. कंत्राटी कामगार व संपात सहभागी नसलेल्या संघटनांचे कर्मचारी व पर्यायी व्यवस्थेद्वारे वीजपुरवठा सुरळीत आहे.

Post a Comment

0 Comments