चिकनघर गावठाण मध्ये शिवजयंती उत्सव साजरा


कल्याण : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथी नुसार असलेली जयंती चिकनघर गावठाणचे शिवसैनिक संकेश भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यावेळी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात करण्यात आली. तसेच उपस्थित मान्यवरांसह महाराजांना मानवंदना देण्यात आले.


 गेली दोन वर्ष निर्बंधांमुळे शिवजयंती साजरी कण्यात आली नव्हती. आता निर्बंध शिथिल झाले असल्याने छत्रपती शिवाजी माह्राज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. चिकनघर गावठाण तर्फे साजरी करण्यात आलेल्या जयंतीत महिला जिल्हा संघटक विजया पोटेपालिका ब प्रभाग क्षेत्र संघटक रवींद्र पाटीलपालिका क प्रभाग क्षेत्र संघटक सचिन बासरेविधानसभा युवा अधिकारी अभिजित बोलेशाखा प्रमुख संतोष भोईरअनिल जैस्वालविवेक विचारे आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments