जागतिक महिला दिना निमित्त रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी तर्फे कोविड योद्धा महिलांचा केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार

मुंबई मनपा निवडणूकीत आरपीआय तर्फे महिलांना 50 टक्के उमेदवारी देणार..


मुंबई दि.9 :-   महिलांना समान न्याय हक्क महामानव  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिले. रिपब्लिकन पक्षात महिलांना समान संधी दिली जाते. आगामी मुंबई मनपा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची 50 टक्के उमेदवारी महिलांना देण्यात येईल असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले म्हणाले. 


               रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने आज दि.8 मार्च रोजी वीर सावरकर सभागृहात जागतिक महिला दिना निमित्त महिला  संमेलन चे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राजमाता जिजाऊ; क्रांतिज्योत माता सवित्राबाई फुले; त्यागमूर्ती माता रमाई या महामातांचा संयुक्तजयंती उत्सव साजरा करण्यात आले.यावेळी कोरोना काळात रुग्णसेवा केलेल्या महिला डॉक्टर आणि परिचारिका यांचा कोविड योद्धा म्हणून  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय  केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


            यावेळी सौ.सीमाताई आठवले; कुमार जित आठवले;  रिपाइंचे  राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णमिलन शुक्ला ; मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मनपा रुग्णालयातील परिचारिका रुचिता विजय कांबळे; प्रज्ञा गोपीनाथ भोसले; लिलबेन परमार; सुनीता माळवे; दिनाबेन वाघेला यांचा कोविडयोद्धा म्हणून नारामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


            जागतिक महिला दिनानिमित्त रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित महिला संमेलनास ना.रामदास आठवले;सौ.सीमाताई आठवले; राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णमिलन शुक्ला मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे;ऍड.आशाताई लांडगे;फुलाबाई सोनवणे;  सौ.शिलाताई गांगुर्डे ; मारवाडी आघाडी च्या अध्यक्षा वंदना मेहता ; गीत ठक्कर; सौ नैना वैराट उपस्थित  होते. 


           या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाइं महिला आघाडी च्या मुंबई अध्यक्षा ऍड.अभयाताई सोनवणे आणि स्वागताध्यक्ष उषाताई रामळू उपस्थित होत्या.  यावेळी रिपाइं युवक आघाडी मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड; दयाळ बहादूर; जिल्हा अध्यक्ष प्रकाश कमलाकर जाधव; विलास तायडे; सिद्धार्थ कासारे; सोना कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. मबिलांची प्रचंड उपस्थिती होती.


जाग गयी है नारी 

चैत्यभूमी ची करा वारी

मेरा भीम है सबको भारी अशी कविता ना रामदास आठवले यांनी सादर केली.


यावेळी ना.रामदास आठवले यांचे सुपुत्र कुमार जित आठवले यांनी उत्स्फूर्त भाषण करीत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


सर्व जाती धर्माच्या महिलांना समान न्यायहक्क मिळवून देण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 


हिंदुकोड बिल सादर केले.महिला जगृत झाल्या तरच समाज जागृत होतो. आई शिक्षित झाली तर सर्व समाज जागृत होईल असे डॉ बाबासाहेब आंबेडकर सांगत असत.असे ना. रामदास आठवले म्हणाले.


कोरोना काळात कोट्यवधी लोकांचे जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश लाभले.असे ना रामदास आठवले म्हणाले.

Post a Comment

0 Comments