जूनियर राष्ट्रीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी एसएसटी महाविद्यालय च्या ३ महिला खेळाडुंची निवड


कल्याण : एसएसटी महाविद्यालय आणि मुंबई बॉल बॅडमिंटन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कुमार कुमारी राष्ट्रीय स्पर्धेपूर्वी चे खेळाडू शिबिराचे आयोजन एसएसटी महाविद्यालयात  करण्यात आले होते. दोन दिवसाच्या निवासी शिबिरामध्ये भारताचे बॉल बॅडमिंटन मार्गदर्शक तसेच रेल्वेचे मार्गदर्शक हनुमंतराव यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. संपूर्ण शिबीर त्यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. शिबिराच्या समारोपावेळी खेळाडुंना ट्रॅक सूट देण्यात आले.


यात मुंबई बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव हरीश सत्पथी तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका बॉल बॅडमिंटन असोसिएशनचे पदाधिकारी दिपक खरातसचिन कालीकललीना कांबळेमंदार परब यांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले. तसेच टीम सोबत प्रथमेश म्हात्रेदक्षता राउतसचिन कालिकल,  आनंद खंडागले मार्गदर्शक आणि मैनेजर म्हणून नियुक्ति करण्यात आली. राष्ट्रीय स्पर्धा  दिंडीगुलतामिळनाडू येथे झाली,  या स्पर्धेत मुंबई ची कर्णधार आणि एसएसटी महाविद्यालयाची खेळाडू आरती यादव ला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.


एसएसटी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. जे. सी. पुरस्वानीउपप्राचार्या डॉ. खुशबू पुरस्वानीउपप्राचार्य जीवन विचारे तसेच क्रीड़ा शिक्षक राहुल अकुलपुष्कर पवारमहाविद्यालयाचे मार्गदर्शक दीपक खरात आणि मुंबई विभागाचे सचिव हरीष सत्पथी  यां सर्वांनी खेळाडुंचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments