कराटे स्पर्धेत कल्याण तालुक्यातील खेळाडू चमकले


कल्याण : वर्ल्ड फुनाकोशी शोतोकन कराटे असोसिएशन च्या वतीने मुलुंड येथे २७ व्या  फुनाकोशी कप स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. हि स्पर्धा महाराष्ट्र शासनाच्या कोविड निर्बंधांचे पालन करून आयोजित केली गेली असल्यामुळे या स्पर्धेत कराटे मधील केवळ काता या क्रीडा प्रकारातील स्पर्धा घेण्यात आली.


          कल्याण मधील मोहन मार्शल आर्ट्स आणि फिटनेस प्लॅनेट येथे मुख्य प्रशिक्षक मोहन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत असलेल्या २२ खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेउन ५ सुवर्ण११ रौप्य आणि ६ कांस्य पदकाची लयलूट केली. या स्पर्धेत राजरत्न साळवेप्रणवी प्रभुवेद पागरेरोसलिन अतकलेसानिका देशमुख हे ५ जण सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले.


         तर यश राठोडअंशुल साहूस्वरा खिस्मतरावसाईश सुरवसेश्रद्धा सुरवसेरिद्धी निनावेविराज अय्यरआदित्य गुजरीआर्यन सौंदानेअद्वैत मोरे आणि श्रावणी पालांडे यांना रौप्य पदक तर मयंक ठाकुरआदर्श मौर्यपार्थ पगारेश्रील दुबे आणि आभा बारहाटे यांनी कांस्य पदकावर आपले नाव कोरले.


या सर्व खेळाडूंना कराटे प्रशिक्षक विनायक कोळी आणि जीवन ठाकुर यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेत सहभागी झालेल्या व विविध पदके प्राप्त केलेल्या खेळाडूंवर कल्याण मधील विविध क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशा स्पर्धेतून सराव केल्यामुळे जून २०२२ मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्ण संधी या खेळाडूंना प्राप्त होणार आहे.

Post a Comment

0 Comments