Aaye The Kyu: दिग्दर्शक विनय कोरे यांच्या नव्या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद


मुंबई, अतृप्त प्रेमाची कहाणी सांगणारे ‘आए थे क्यू’ हे नवीन हिंदी गाणे नुकतेच युट्यूबवर प्रदर्शित झाले आहे. ‘लाउडबी म्युझिक’ या लेबलअंतर्गत हे गाणं प्रदर्शित झालं असून विनय कोरे फिल्म्स यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे. बॉलिवूड गायक जय मेहता याचा या गाण्याला आवाज लाभला असून त्याने सचिनसह हे गाणे शब्दबद्ध केले आहे.


         या गाण्याचा व्हिडिओ दिग्दर्शक विनय कोरे यांनी दिग्दर्शित केला असून या गाण्याला पहिल्या दिवसापासूनच तुफान प्रतिसाद मिळत आहे. विनय कोरे यांनी याआधी अनेक संगीत व्हिडिओ दिग्दर्शित केले असून या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकले आहे.


         शेऑन एलॉयसिस, उत्सव त्यागी, जय मेहता आणि स्टेला शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या गाण्यात तरुण आणि आशावादी जोडप्यामधील अतृप्त प्रेम दाखवण्यात आले आहे. काही लोक आपल्या आयुष्यात येतात आणि जगणं सुंदर होऊन जातं. मात्र, अचानक ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाते, त्यामुळे ती व्यक्ती आपल्या आयुष्यात आलीच का असा प्रश्नही आपल्या पडतो. प्रेमिकांमधील हीच भावना या गाण्यातून रेखाटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


         गाण्यातील अद्वितीय रचना आणि सुमधूर आवाजामुळे हे गाणं अल्पावधित लोकप्रिय झाले आहे. तसेच, व्हिडिओचे दिग्दर्शन सृजनतेने केल्याने गाणं ऐकताना आणि पाहताना प्रेमिकांमधील भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे या गाण्याने हजारो लोकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे. दिल्लीतील ‘लोकेशन फॉर यू’ या सुंदर सेटवर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments