मेट्रो जंक्शन मॉलमध्ये 8 महिला यशवंतांचा’ सत्कार


कल्याण : मेट्रो जंक्शन मॉलमध्ये ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी ‘इंडियन आयडॉल मराठी’ स्टार गायक अनिकेत घनगव यांच्या बँड परफॉर्मन्ससह कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रांतातील ‘8 महिला यशवंतांचा’ सत्कार करण्यात आला.


         रेखा लाके यांना कचरा विलगीकरणासाठी केडीएमसीला मदत करण्यासाठी 50 महिलांची टीम तयार केल्याबद्दल, आस्था नायकर या 11 वर्षीय मुलीला स्केटिंगमध्ये 81 तास 10,750 लॅप्स पूर्ण करण्याचा विक्रम, श्रावणी गायकवाड – 11 वर्षीय ट्रेकर हिला महाराष्ट्रातील सर्वात अवघड किल्ले ट्रेकिंगसाठी पुरस्कार, विजया कदम प्रसिद्ध मराठी लोक लावणी नृत्यांगना, राजलक्ष्मी पुजारी महिला पत्रकार, अभियंता सपना कोळी केडीएमसीमधील अभियंता यांना उल्लेखनीय कार्यासाठी पुरस्कार, अभियंता अनिता परदेशी पीडब्ल्यूडी विभागातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी पुरस्कृत केलं गेलं. वंदना लोखंडे एका एनजीओच्या संस्थापक त्यांना प्रशंसनीय कार्यासाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Post a Comment

0 Comments