भिवंडी दि 7 (आकाश गायकवाड ) काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुक प्रचार दरम्यान एका जाहीर सभेत आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांची हत्या केल्याचे वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करून आरएसएसचे राजेश कुंठे यांनी भिवंडी न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात अवामान याचिका दाखल केली असताना तारीख पे तारीख सुरु असून आज भिवंडी न्यायालयामध्ये राजेश कुंठे विरुद्ध राहुल गांधी यांची मानहानी बाबत सुनावणी चालू असतांना फिर्यादी तर्फे ॲड प्रबोध जयवंत व ॲड .नंदू फडके यांनी फिर्यादीच्या वतीने बाजू मांडली.
सदर केसमध्ये आज फिर्यादी च्या वकिलांनी सांगितले की, त्यांना फिर्यादिच्या सरतपासणी अगोदर त्यांना न्यु -दिल्ली येथील नोटरी साक्षीदार तपासणे होते,परंतु मे.न्यायालयाने फिर्यदीची सरतपासणी झाल्याशिवाय दुसरा साक्षीदार तपासण्यात येणार नाही असे सांगून त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला व सदर आदेशा विरुद्ध फिर्यादी यांनी मे.उच्च न्यायालय मुंबई येथे रीट दाखल केली असल्याने व त्याची सुनावणी आज रोजी असल्याने फिर्यदीच्या वकिलांनी अर्ज दिल्याने मे.भिवंडी न्यायालय त्यांना शेवटची संधी देऊन पुढील तारीख 22 मार्च ठेवण्यात आलेली आहे.
तर राहुल गांधी तर्फे ॲड. नारायण अय्यर यांनी बाजू मांडली,त्यांनी देखील राहुल गांधी हे गोवा, पंजाब व उत्तरप्रदेश येथे निवडणूक असल्याने ते व्यस्त असल्याने आरोपी यांचा देखील गैरहजेरीचा अर्ज दिला,मे.न्यायालयाने आरोपीचा अर्ज मंजूर केला. मे. भिवंडी न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मा. न्यायाधीश जे.व्ही. पलीवाल यांच्या न्यायालयासमोर सुनावणी होऊन सदर केसमध्ये 22 मार्च अशी तारीख नेमून पुढील तारखेस सुनावणी घेण्याचे आदेश मे. न्यायालयाने दिलेले आहेत...
0 Comments