केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३" या विषयावर आभासी व्याख्यान


डोंबिवली ( शंकर जाधव ) प्रगती महाविद्यालयाच्या लेखा विभागातर्फे ऑनलाइन स्वरूपात "केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३" या विषयावर निःशुल्क आभासी जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानाला ऑनलाइन पद्धतीने डोंबिवली, कल्याण, ठाणे या शहरातील १०० हून अधिक लोकांनी हजेरी लावली होती.


         या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते चंद्रशेखर टिळक, माजी कार्यकारी उपाध्यक्ष, NSDL लिमिटेड, मुंबई यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३ बाबत तसेच व्यावसायिक शिक्षण, नोकरीच्या संधी, डिजिटल रूपया  याबाबतीत सविस्तर माहिती सादर केली. मा.श्री.जगन्नाथ पाटील, माजी मंत्री आणि अध्यक्ष, T.Z.A.S.P. मंडळ डोंबिवली यांनी विशेष उपस्थित लावली होती. 


        या कार्यक्रमाला प्राचार्या डॉ.ज्योती पोहाणे, उपप्राचार्या डॉ.अनुजा बापट, प्राध्यापक डॉ.मनोज मकवाना आणि प्राध्यापक प्रिया पाठक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच प्रगती महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेतर्फे विश्वनाथ बिवलकर व राहुल नाले यांनीही सहकार्य केले.


        यापुढे देखील समाजासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा आणि लेखा व वित्त क्षेत्रातील तज्ञांची व्याख्याने प्राचार्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे लेखा विभागा तर्फे आयोजित करण्याची आमची योजना आहे असे प्राध्यापक डॉ.मनोज मकवाना यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments