डोंबिवली ( शंकर जाधव ) एकीकडे गोव्याच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वचननाम्यात रोजगाराचा मुद्दा तर दुसरीकडे महाराष्ट्रात हाच पक्ष बेरोजगारी वाढवतोय.डोंबिवलीतील कारखाने स्थलांतरीत करण्याच्या निर्णय सरकाचा चुकीचा असून येथील मजुरांचा शाप या सरकारला लागेल अश्या शब्दात भाजपा आमदार रविंद्र चव्हाण यांनी संताप व्यक्त केला. राज्य सरकारने डोंबिवलीतील १५६ रासायनिक कंपन्या पाताळगंगा येथे स्थलांतरीत करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर उद्योजकांबरोबर आमदार चव्हाण यांनी बैठक घेतली.
आमदार चव्हाण म्हणाले, नागपूर नगरपालिकेने केमिकलयुक्त पाण्यावर प्रक्रिया करून स्वच्छ पाणी करण्याचा प्रकल्प राबविला आहे. हे जर तिकडेशक्य होत असेल तर कल्याण-डोंबिवलीत का होत नाही. वास्तविक महाविकास आघाडी सरकारची तशी मानसिकता नाही. म्हणून तर कोणताही विचार न करता राज्य सरकारने डोंबिवलीतील १५६ रासायनिक कंपन्या पाताळगंगा येथे स्थलांतरीत करण्याचा निर्णय जाहीर घेतला.याचा फटका येथील भूमिपुत्रांना जास्त बसणार आहे. तर अनेक कामगार बेरोजगार होतील. याला जबाबदार हे सरकार असेल हे जनतेने विसरू नये.
येथील कारखाने स्थलांतर हे यावर उपाय होऊ शकत नाही. कारखाने स्थलांतरासाठी जेवढा पैसा लागेल ना एवढ्या पैसात येथे प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रकल्प राबविणे गरजेचे आहे.या कंपन्या मधील ५० हजार कामगार आणि इंडस्ट्रीवर अवलंबून असणारे छोटे उद्योग देखील बंद होतील. पाताळगंगा परिसरातील अनेक उद्योग बंद होतील म्हणून विकसित झालेल्या उद्योगांना संपवू नका. आम्ही कारखान्याचे स्थलां होऊ देणार नाहीअशी ठाम भूमिका आमदार चव्हाण यांनी यावेळी घेतली.
0 Comments