भिवंडी दि 9(प्रतिनिधी )कर्नाटक राज्य सरकार ने मुस्लिम।विद्यार्थिनींना शैक्षणिक संकुलात हिजाब घालण्यास मनाई केली असून त्या विरोधात कर्नाटक राज्यात तीव्र पडसाद उमटत असल्याने तेथील महाविद्यालय शाळा तब्बल तीन दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत.
तर हिजाब विरोधात भगवी शाल आंदोलन जोर धरत असताना महाराष्ट्रात हिजाब च्या समर्थनात निदर्शने सुरू केली असून भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शोएब खान गुड्डू यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटक सरकार विरोधात हिजाब समर्थनात निदर्शने करण्यात आली.
यावेळी महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे,माजी शहर कार्याध्यक्ष प्रविण पाटील सह अनेक कार्यकर्त्यांसह अनेक विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या .यावेळी या मोर्च्याने उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे जाऊन हिजाब च्या समर्थनात कर्नाटक सरकारचा निषेध करणारे निवेदन दिले आहे.. .
0 Comments