शहराच्या विद्रुपी करणात भर घालणाऱ्या बॅनर्स, शेड्स, अतिक्रमणावर केडीएमसीची कारवाई


कल्याण :   कल्याण डोंबिवली  नगरी अधिकाधिक  चांगलीसुंदर दिसावी  तसेच महापालिका परिसरातील  नागरिकांना पदपथावरुन चालणे सोयीचे व्हावे या दृष्टीकोनातून आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतील कायापालट अभियान सर्वत्र राबविले जात आहे. याचं अभियानांतर्गत  ग प्रभागाच्या सहा. आयुक्त रत्नप्रभा कांबळे यांनी डोंबिवली पूर्व येथील  दत्तनगररामनगर परिसरातील  ३५ बॅनर्स हटविण्याची धडक कारवाई  केली.त्याचप्रमाणे  जे प्रभागातही सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी कल्याण पूर्व काटेमानिवली रोडवालधुनीजकात नाका या परिसरातील ४१ बॅनर ,होर्डिंग काढण्याची धडक कारवाई  केली ड प्रभागातही सहा. आयुक्त सविता हिले यांनी कल्याण पूर्व परिसरात  पुनालिंक रोड ते विजय नगरआमराई  या रस्त्यावरील फुटपाथवर दुकानदारांनी केलेले अतिक्रमण, वेदर शेडबाकडेहातगाड्या आदींवर निष्कासनाची धडक  कारवाई  केली. फ प्रभागात सहा. आयुक्त किशोर  शेळके यांनी डोंबिवली पूर्व येथील कल्याण रोडनेहरू रोडफडके  रोड मानपाडा रोड येथील  सुमारे ४९ बॅनर्स काढण्याची धडक कारवाई केली.

Post a Comment

0 Comments