प्रणव पेणकर यांची कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ अध्यक्षपदी निवड


कल्याण : कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ अध्यक्षपदी प्रणव पेणकर यांची निवड करण्यात आली आहे. कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ प्रमुख संघटक सुधाकर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्षा टॅक्सी चालकांचे ज्वलंत प्रश्न विविध अडचणी चर्चा विनमय व सोडवण्यासाठी ठोस निर्णय व भूमिका याकरिता कोकण विभागातील शहर रिक्षा टॅक्सी संघटना प्रमुख पदाधिकारी प्रतिनिधी यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. 


          ठाणेरायगडरत्नागिरीसिंधुदुर्गपालघर जिल्हा व एमएमआरडी मुबंई क्षेत्र व कोकण विभागातील सर्व शहरातील प्रमुख रिक्षा टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.


कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ कोकण विभागातील प्रमुख रिक्षा टॅक्सी संघटना संलग्न जुना महासंघ आहे. गेली चाळीस वर्षे संस्थापक दिवंगत नेते प्रकाश पेणकर यांनी महासंघाची धुरा सांभाळुन कोकण पट्ट्यात रिक्षा टॅक्सी चालकांना संघटीत राखुन रिक्षा टॅक्सी चालंकासाठी लढा दिला. त्यांच्या निधनानंतर कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ अध्यक्ष पद रिक्त होते.  रिक्षा टॅक्सी प्रतिनिधी मेळाव्यात उच्चविद्याविभूषित प्रणव पेणकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.


या मेळाव्यात अवैध ओला उबर रॅपिडो ओमिगो कंपन्या बेकायदेशीर बाईक प्रवासी वाहतूक विरोधात अँप बंद करुन कंपन्यावर शासन परिवहन कायदेशीर कारवाई करण्यात यावे अन्यथा लवकरच तिव्र आदोलंन छेडावे लागेल असे महासंघाचे कार्याध्यक्ष हेमंत पवार पालघर आपल्या मार्गदर्शन पर भाषणात म्हणाले. 


उपाध्यक्ष विनायक सुर्वे ठाणे, खजिनदार अविनाश खिलारे बदलापुर उपाध्यक्ष सुनिल बोर्डे नवीमुबंई प्रसन्ना कडुकिरण म्हाञे पेण आदी पदाधिकारी यांनी रिक्षा टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र कल्याण कारी महामंडळनविन रिक्षा टॅक्सी परवाने वाटप बंदी तसेच वाहतूक पोलिस वाहतुक नियमपालन कसुरी चुकीच्या पध्दतीने फोटो काढणे वाहतुक नियमन पध्दत रिक्षाचालकांच्या विविध अडचणी प्रश्न समस्या  उपस्थित केल्या.


         नवनिर्वाचित अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी रिक्षा टॅक्सी चालकांचे विविध प्रश्न
, अडचणी समजुन पुढील काळात सर्व रिक्षा टॅक्सी संघटना पदाधिकारी यांना विश्वासात व बरोबर घेऊन तमाम रिक्षा टॅक्सी चालकांचे प्रश्न प्रामाणिक पणे सोडविण्यासाठी प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली.  मेळाव्याचे सुञसंचालन चिटणीस राजु राऊत यांनी केले. 

Post a Comment

0 Comments