पोलिसाच्या मुलावर जीवघेणा हल्ला... एक अटक,तिघे फरार..


डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण मधील विजयनगर परिसरात एका तरुणावर चौघांनी धारदार शस्त्रांनी सपासप वरून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी दुपारच्या दरम्यान घडली.यात एकाला अटक करण्यात आली असून उर्वरित तिघा हल्लेखोरांचा कोळसेवाडी पोलीस शोध घेत आहेत.


        मिळालेल्या माहितीनुसार , हल्लेखोर अमोल भंडारी याला पोलिसांनी अटक केली असून उर्वरित हल्लेखोर अक्षय मोरे,गणेश सानप,साहिल मोरे फरार आहेत.मुंबई कुर्ला पोलिस खात्यात  फुलचंद जाधव काम करतात.फुलचंद यांचा मुलगा अजित हा नोकरी मिळवण्यासाठी  एका ठिकाणी इंटरव्ह्यू गेला होता.दुपारी परत आल्यावर परिसरात आपल्या मित्राबरोबर गप्पा मारत असताना अचानक त्याच्यावर चौघांनी धारदार शस्त्राने वार केले.


      या हल्ल्यात अजितच्या  पाठीवर व छातीवर गंभीर जखमा झाल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविराधात गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस हल्लेखोरांचा कसून शोध घेत आहेत.

Post a Comment

0 Comments