पावणेदोन वर्षाच्या साम्राज्य मराठे या बालकाने केली कळसूबाई शिखरावर यशस्वी चढाई


कल्याण : वेड महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखराचे चढाई कळसुबाईची सह्याद्री अग्नी आणि पृथ्वीच्या मिलनातून जन्माला आलेला मूर्तिमंत पौरुषाचा आविष्कार चिरंजीव सौंदर्य अशा या महाराष्ट्रदेशीच्या सह्याद्रीच्या अतिउच्च शिखराचा  मान मिळाला आहे. एका उत्तुंग शिखराला ५४२७  फूट उंच आभाळी विराजमान झालेल्या कळसुबाई शिखराला सर्वात लहान वयात याच शिखराची चढाई  करण्याचा मान कोल्हापूर जिल्ह्यातील साम्राज्य मराठे या अवघ्या पावणेदोन वर्षाच्या बालकाने मिळवला आहे.


पहाटे जेव्हा साम्राज्य बारी गावात पोहोचला त्यावेळी महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर ढगाच्या आडुन लपंडाव खेळत होते जणू त्यास खुणावत होते. छोट्या साम्राज्यने  सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी  भंडारदरातील बारी गावातून शिखराच्या दिशेने आपली छोटी छोटी पावले टाकायला सुरुवात केली. रुळलेल्या पायवाटेने पहिली टेकडी चढून तेथे नव्याने बांधण्यात आलेले कळसुबाईच्या मंदिरातील देवीचे दर्शन घेऊन महाराष्ट्र घडवणाऱ्या सह्याद्रीच्या कळसाची उंच आभाळ जाणारी चढाई करण्यास सुरुवात केली.


महाराष्ट्रातील सर्वात उंच असणारे कळसुबाई शिखर सर करण्याचे प्रत्येक ट्रेकर्सचे स्वप्न असते. शिखर सर करताना अनुभवी ट्रेकर्सचा सुद्धा दम निघतोपण हे अवघड आव्हान साम्राज्य मराठे ह्या पावणेदोन वर्ष वय असणाऱ्या चिमुकल्याने व आठ वर्षाच्या जान्हवी पाटील यांनी स्वीकारले. अवघड पायवाटधडकी भरवणाऱ्या दऱ्यापायाला घाम फोडणाऱ्या लोखंडी शिड्याहवेतील गारवासोसाट्याचा वारा ह्यावर मात करतदुपारी १२ वाजून ४८ मिनिटांनी सर्वोच्य माथ्यावरील कळसूबाईच्या मंदिराजवळ अगदी उत्साहात पोहचण्यात यश मिळवले.


साम्राज्य मराठे हा पावणेदोन वर्षाचा चिमुकला कळसुबाई शिखर सर करणारा महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सर्वात लहान वयाचा गिर्यारोहक ठरला. जिद्दचिकाटीसंयम व आत्मविश्वासाच्या जोरावर हे दैदिप्यमान यश मिळवता आले, इतिहास घडवता आला.  विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रजित मराठेसायली मराठेअवधुत पाटील यांच्या प्रोत्साहनातून कळसुबाई शिखरावर चिमुकल्यांना यशस्वी चढाई करता आली. यामुळे सर्वच स्तरातून यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असल्याची माहिती क्रीडा प्रशिक्षक अविनाश ओंबासे यांनी दिली.


तर माझ्या मुलाने जो पराक्रम केला आहे तो खरंच कौतुकास्पद असून त्याच्या जिद्दीची आम्हाला कल्पना होती. पण असा मोठा पराक्रम करेल असं वाटत नव्हतं पहिल्यापासूनच त्याला विविध खेळ आणि अशा दऱ्या खोऱ्या मधून विविध छोट्या-मोठ्या ट्रॅक केल्या आहेत. पुढे हि त्याने अशीच प्रगती करावी आणि एक दिवस हिमालय  ही सर करावे अशी अपेक्षा असल्याची प्रतिकिया इंद्रजीत मराठे यांनी दिली. 

Post a Comment

0 Comments