कल्याणच्या ४ वर्षीय ओम ढाकणेने सर केला भैरवगड


कल्याण : कल्याण मधील ४ वर्षीय ओम महादेव ढाकणे याने सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील सर्वात कठीण असा समजला जाणारा किल्ले "मोरोशीचा भैरवगड" सर करून पुन्हा एकदा कल्याण शहराच्या मुकुटात कौतुकाचा तुरा खोवला आहे. या आधी ही महाराष्ट्रातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून त्याने कल्याणचा श्री मलंगगड सर करून यशाला गवसणी घातली होती. यवेळी त्याने त्यापुढे ही प्रयत्न वाढवून मोरोशीचा भैरवगड सर करून, हा किल्ला सर करणारा सर्वात लहान गिर्यारोहक बनण्याचा मान मिळवून कल्याण शहराचे नाव अधिक उंचावर नेले आहे.


ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात माळशेज घाटाखाली मोरोशी गावाच्या बाजूला असलेला सुमारे ०४ हजार फूट उंच, चाळीस-पन्नास फूट रुंद, असा भिंतीसारखा दिसणारा एक लोभसवाणा डोंगर. आजूबाजूला सरळसोट कडेडोकावलं की चक्कर यावी इतकी खोली, भर दुपारी ही सूर्यकिरणे अडवली जातील अशा डोंगरांचा शेजार. त्याच्या एका बाजूला सरळसोट भिंत आणि दुसर्‍या बाजूच्या पोटात कोर असा हा भीमरूपी कडा.


कल्याणचा "सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर" हा संघ सह्याद्रीच्या खोऱ्यात धाडसी मोहिमा नित्यनेमाने आखत असतो आणि संघाचे पवन घुगे, दर्शन देशमुख, रणजित भोसले, भूषण पवार, अक्षय जमदरे, राजेश गायकर, प्रशिल अंबाडे, लतीकेश कदम आणि विकी बोरकुले आदींनी ओमला सहकार्य केले. रात्री एक वाजता मोरोशी या गावातून ट्रेक ला सुरुवात झाल्यानंतर जंगलातील वाट तुडवत मोरोशीच्या भैरवगडाच्या माचीवर सुमारे ३ ला पोहचल्या नंतर तिथे थोडा आराम करून पुन्हा एकदा कड्याच्या पायथ्याशी पोहचण्यासाठी सुमारे १ तासाचा ट्रेक करावा लागतो.

Post a Comment

0 Comments