कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षण परिषद संपन्न


कल्याण : शासन परिपत्रकानुसार कल्याण-डोंबिवली महापालिका शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी जे. जे. तडवी यांच्या मार्गदर्शनात सर्व २१ सीआरसींचे शिक्षण परिषद आयोजन विभाग निहाय सर्व सीआरसी समाविष्ट होतील अशा पध्दतीने चार विभागांमध्ये करण्यात आले होते.


कोविड-१९ प्रादुर्भाव कालावधी नंतर विद्यार्थ्यांना सुलभ व सहज अध्ययन अनुभव प्राप्त होणे अपेक्षित आहे. हे उद्दिष्ट समोर ठेवून शिक्षण परिषदांचे आयोजन करण्यात आले. कडोंमनपा शाळा क्र २६ जाईबाई येथे प्रशासन अधिकारी जे. जे. तडवी व विस्तार अधिकारी जगदाळे यांनी उपस्थीतांना मराठी भाषा तथा प्रशासकीय बाबींवर मार्गदर्शन केले. डायट अथिव्याख्याता चौधरी यांनी डायटस्तरीय विविध विषयांवर मार्गदर्शन केले. मार्गदर्शक तज्ज्ञ यांनी भाषा या विषयावर सूसंवाद साधला तर वक्ते झुंजारराव यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.


कडोंमनपा शाळा क्र ३२ अटाळी येथे विजय सरकटे यांनी भाषा दिन निमित्त सुव्यवस्थीत नियोजन व भाषेचे महत्त्व विशद करताना विविध दाखले देऊन मार्गदर्शन केले. तसेच शिक्षण परिषदेत उपस्थित सर्व मुख्याध्यापकशिक्षक यांनी येत्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनपा शाळांमध्ये प्रवेश उत्सव साजरा करण्याचे नियोजन करण्याच्या सुचना देण्यात आल्या. विज्ञान प्रदर्शन संदर्भाने उपयुक्त माहीती देण्यात आली. 


तज्ज्ञ मार्गदर्शक यांनी विषय निहाय संवाद साधल. डायट जेष्ठ अधिव्याख्याता डॉ. वाघ  यांनी अटाळी, गांधी चौक व भावे सभागृह येथील शिक्षण परिषदेस भेटी देऊन मार्गदर्शन केले. कडोंमनपा शाळा १ क गांधी चौक येथे शिक्षण परिषदेस जगदाळे यांनी मराठी भाषा या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. तथा तज्ज्ञ मार्गदर्शक यांनी भाषा, गणित, विज्ञान विषयावर संवाद साधला.


डोंबिवली विभाग पुर्व पश्चिम यांची शिक्षण परिषद भावे सभागृह शाळा क्र.८७/३ येथे संपन्न झाली शिक्षण विस्तार अधिकारी चौधरी यांनी गुणवत्ता विकास या विषयावर मार्गदर्शन केले. व तज्ञ मार्गदर्शक यांनी भाषा, गणितविज्ञान विषयांवर शिक्षकांशी संवाद साधला. विभाग निहाय सर्व सीआरसी प्रमुखांची उपस्थीती होती. शिक्षण परिषद नियोजन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अर्चना जाधव यांनी विषयसाधनव्यक्ती व सीआरसी प्रमुख यांच्या समन्वयाने सुलभ नियोजन करुन दिले.


सर्व विषयसाधनव्यक्तींनी नेमून दिलेले विषयांनुसार मार्गदर्शन केले त्यात प्रामुख्याने १०० दिवस वाचन उपक्रम, रिड टू मी अॅप, दिक्षा ॲप, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव माहे निहाय उपक्रम, विज्ञानाचा गुरुवार, गोष्टींचा शनिवार, एक भारत श्रेष्ठ भारत, फिट इंडिया, गणितीय संबोध, नाविण्यपूर्ण विज्ञान केंद्र तसेच गुणवत्ता विषयक उपक्रमांचे मार्गदर्शन केले. सर्व चार विभागातून २१५ शिक्षकांची उपस्थिती शिक्षण परीषदेस होती. या शिक्षण परिषदेमुळे सर्व शिक्षकांमध्ये उत्साहाचे  वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.

Post a Comment

0 Comments