वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष पदी सुनिता गायकवाड


कल्याण : वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेश अध्यक्षपदी सुनिता गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थित त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. सुनिता गायकवाड या गेल्या ५ वर्षांपासून पक्षासोबत काम करत असून विविध पदांवर जबाबदारी सांभाळली आहे.


महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थेच्या आगामी निवडणूका लक्षात घेता वंचित बहुजन आघाडीने पक्ष विस्तार आणि संघटनात्मक बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आंबेडकर भवन येथे आयोजित बैठकीत पक्षाचे अध्यक्ष  ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना पूर्ण ताकदीने कामाला लागण्याचे आदेश दिले.


 तसेच कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणारे भाषण करत भविष्यातील रणनीतीबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकुरराज्य उपाध्यक्ष गोविंद दळवीमुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन खानसतिश शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments